पुणे : पुणे रेल्वेस्थानकावर ज्येष्ठ नागरिक आणि अपंग प्रवाशांच्या सुविधेसाठी चालविण्यात येत असलेली ‘विशेष प्रवासी सशुल्क बॅटरी ऑपरेटेड कार’ सेवा काही महिन्यांपासून बंद पडली आहे.देखभाल-दुरुस्ती वेळेवर होत नसल्याने आणि संबंधित कंत्राटदाराला व्यावहारीकदृष्ट्या परवडत नसल्याने या कार रेल्वेस्थानकात धूळखात पडून आहेत. त्यामुळे प्रवाशांना एका स्थानकावरून दुसऱ्या स्थानकावर जाण्यासाठी त्रास होत आहे. ज्येष्ठ आणि दिव्यांग प्रवाशांची परवड होत असून, ही सेवा पुन्हा सुरू करण्याची मागणी प्रवाशांकडून होत आहे.

रेल्वे बोर्डाच्या नव्या धोरणानुसार ज्येष्ठ नागरिक आणि अपंग प्रवाशांसाठी शुल्क आकारून स्टेशनवर बॅटरी कार सेवा २०१९ मध्ये सुरू करण्यात आली. या वेळी एका खासगी कंपनीला सेवा देण्याचे कंत्राट देण्यात आले. मात्र, वाहनचालकांनी वाहन चालविण्याचा प्रश्न निर्माण झाल्याने ही सेवा बंद पडली होती.

हेही वाचा…कात्रज कोंढवा रस्त्याबाबत मोठी अपडेट, जागा ताब्यात देण्यासाठी आले इतके प्रस्ताव..!

प्रवाशांच्या गैरसोयीमुळे ऑगस्ट २०२३ मध्ये ही सेवा पुन्हा सुरू करण्यात आली. स्थानकावर दोन नवीन बॅटरी कार सुरू करण्यात आल्या. त्यासाठी प्रति प्रवासी ५० रुपये आकारण्यात आले. त्यानुसार पुणे रेल्वे स्थानकावरून प्रवास करणाऱ्या वृद्ध, ज्येष्ठ नागरिक आणि गरोदर महिलांसाठी ही सेवा फायद्याची ठरली होती. मात्र, कंत्राटदाराला आर्थिकदृष्ट्या परवडत नसल्याने आणि वेळेवर देखभाल-दुरुस्ती होत नसल्याने कारसेवा बंद पडली आहे, तर कारसेवेमध्ये तांत्रिक बिघाड निर्माण झाल्याने ती बंद असल्याचे रेल्वे प्रशासनाकडून सांगण्यात आले.

हेही वाचा…पवनानगर बोट दुर्घटना, तरुणांच्या मृत्यूप्रकरणी बंगला मालक , बोट मालकांवर गुन्हा दाखल

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

पुणे रेल्वे स्थानकात विशेष प्रवासी सशुल्क बॅटरी ऑपरेटेड कारसेवा सुरू आहे. तांत्रिक बिघाड झाल्याने या कार बंद आहेत. पुढील आठवड्यात ही सेवा पुन्हा सुरू करण्यात येईल. रामपाल बडपग्गा, पुणे विभागीय जनसंपर्क अधिकारी