पुणे : हिंजवडीच्या माहिती तंत्रज्ञान (आयटी) केंद्राला शिवाजीनगरच्या मध्यवर्ती केंद्राशी जोडणाऱ्या पुणेरी मेट्रोच्या मार्गिका तीन प्रकल्पाच्या कामाने चांगलाच वेग पकडला आहे. या मार्गावरील ५ हजार सेगमेंटची उभारणी पूर्ण करण्यात आली आहे. या मार्गावरील ८० टक्के खांबाची उभारणी आता पूर्ण झालेली आहे.

हिंजवडी ते शिवाजीनगर मार्गावरील मेट्रो मार्गिका तीनचे काम पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरण (पीएमआरडीए) तर्फे सार्वजनिक खासगी भागीदारी (पीपीपी) तत्त्वावर टाटा समूहाने हाती घेतले आहे. त्याच्या कार्यान्वयासाठी पुणे आयटी सिटी मेट्रो रेल लिमिटेड या विशेष कंपनीची स्थापना करण्यात आलेली आहे. पुणेरी मेट्रोच्या मार्गिका तीनच्या दोन हजार सेगमेंटची उभारणी २४ एप्रिलला पूर्ण झाली होती. त्यानंतर सात महिन्यांच्या कालावधीत आणखी तब्बल तीन हजार सेगमेंट उभे करण्यात आले आहेत. प्रत्यक्ष काम सुरू झाल्यापासून १६ महिन्यांत पाच हजार सेगमेंटच्या उभारणीचा टप्पा पूर्ण करण्यात आला आहे.

हेही वाचा >>>पुणे : प्रदूषण रोखण्यासाठी उपाययोजना न केल्याने शापूरजी पालनजी कंपनीला दंड

याबाबत पुणे आयटी सिटी मेट्रो रेल लिमिटेडचे मुख्य कार्यकारी अधिकारी आलोक कपूर म्हणाले की, प्रकल्पाचे काम वेगाने आणि पूर्ण क्षमतेने सुरू आहे. त्यामुळे १६ महिन्यांत पाच हजार सेगमेंटची उभारणी पूर्ण झाली आहे. तसेच काम सुरू झाल्यापासून केवळ दीड वर्षाच्या कालावधीत ८० टक्के खांब उभारणी पूर्ण करण्याचा टप्पा गाठण्यात आम्हाला यश मिळाले आहे.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

हिंजवडी ते शिवाजीनगर मार्गावरील मेट्रोच्या उभारणीमुळे सुलभ, वेगवान व स्वस्त सार्वजनिक वाहतुकीचा पर्याय उपलब्ध होणार आहे. या प्रकल्पाचे काम नियोजित वेळेत पूर्ण करण्यासाठी पूर्ण क्षमतेने काम सुरू आहे.- आलोक कपूर, मुख्य कार्यकारी अधिकारी, पुणे आयटी सिटी मेट्रो रेल लिमिटेड