पुणे: महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाचे (एसटी) शिवाजीनगर स्थानक वाकडेवाडीला हलवल्यानंतर चार वर्षांनी अखेर ते मूळ जागी उभारण्याचा निर्णय झाला आहे. स्थानकासोबत व्यावसायिक संकुल उभारण्याचा एसटी महामंडळाचा प्रस्ताव महामेट्रोने फेटाळला होता. यानंतर आता एसटीने व्यावसायिक संकुलाऐवजी केवळ स्थानक उभारण्याचा निर्णय घेतला आहे. या स्थानकाचा आराखडा या आठवड्यात अंतिम होणार आहे.

शिवाजीनगर एसटी स्थानकाची चार एकर जागा होती. त्यातील सुमारे एक एकर जागा महामेट्रोला भुयारी मेट्रो स्थानक उभारण्यासाठी देण्यात आली. याबाबत मेट्रो आणि एसटीमध्ये करार झाला होता. शिवाजीनगर स्थानक पाडल्यानंतर तात्पुरत्या स्वरुपात ते २०१९ मध्ये वाकडेवाडी येथे दुग्धविकास विभागाच्या जागेत हलवण्यात आले. या जागेचे भाडे मेट्रो दुग्धविकास विभागाला देणार, असा निर्णय झाला होता. तीन वर्षांच्या कालावधीसाठी हे ठरले होते. आता त्याला चार वर्षे उलटली असून, शिवाजीनगर मेट्रो स्थानक सुरू झाले आहे. तरीही एसटी स्थानक अजूनही वाकडेवाडी येथेच आहे.

Loksatta kutuhal Potential for environmental protection in artificial intelligence
कुतूहल: कृत्रिम बुद्धिमत्तेत पर्यावरण रक्षणाची क्षमता…
Who is Madhurima Raje?
Madhurima Raje : सतेज पाटील ज्यांच्यामुळे ढसाढसा रडले…
Decisions that protect the interests of consumers
ग्राहकांच्या हिताचे रक्षण करणारे निकाल
Indian team focus on net practice for Border Gavaskar Trophy sport news
बॉर्डर-गावस्कर करंडकासाठी भारताचा नेट सरावावर भर
govardhan puja 2024 date
Govardhan Puja 2024 : जाणून घ्या गोवर्धन पूजेचा शुभ मुहूर्त आणि पूजा विधी; गूगलवर ट्रेंड होतोय कीवर्ड
Discrepancy in teaching hours in RTE and State Syllabus
आरटीई, राज्य अभ्यासक्रम आराखड्यातील अध्यापन तासांमध्ये विसंगती… झाले काय, होणार काय?
Bigg Boss 18 Digvijay Singh Rathee and Kashish Kapoor to enter in salman khan show
Bigg Boss 18: दिवाळीच्या मुहूर्तावर ‘बिग बॉस’च्या घरात होणार मोठा धमाका! दोन दमदार वाइल्ड कार्डची होणार एन्ट्री
diwali muhurat trading
विश्लेषण: शेअर बाजारात मुहूर्त ट्रेडिंग म्हणजे काय? यंदा कधी? त्याचे महत्त्व काय?

हेही वाचा… आईच्या अपमानाचा बदला घेण्यासाठी मुलाकडून सराफावर कोयत्याने वार

एसटीच्या जागेपोटी शिवाजीनगर एसटी स्थानक महामेट्रो उभारणार आहे. महामेट्रोने तळमजल्याचे बांधकाम करून, त्यावर २१ फलाटांचे स्थानक आणि एसटीची कार्यालये असे बांधकाम करून देण्याची तयारी दर्शविली आहे. एसटीने या जागी व्यावसायिक संकुल बांधण्याचा आग्रह धरला होता. याबाबत एसटीच्या उपसरव्यवस्थापकांनी महामेट्रोला ४ मे रोजी पत्र पाठविले होते. त्यात शिवाजीनगर येथे एसटीच्या जागेवर व्यावसायिक संकुल उभारण्याची व्यावसायिक व्यवहार्यता तपासण्याची मागणी करण्यात आली. त्यावर महामेट्रोने २२ ऑगस्टला एसटीला पत्र पाठवून व्यावसायिक संकुल उभारणे व्यवहार्य नसून, तिथे एसटी स्थानक उभारून देण्याचा पुनरुच्चार केला होता. आता यावर एसटीने केवळ स्थानक उभारण्याचा अंतिम निर्णय घेतला आहे, अशी माहिती एसटीतील सूत्रांनी दिली.

शिवाजीनगर कार्यशाळा कुठे?

शिवाजीनगर स्थानकात आधी एसटीची कार्यशाळा होती. ती एसटी स्थानकासोबत वाकडेवाडीला स्थलांतरित करण्यात आली. आता ही कार्यशाळा सांगवी येथे हलविण्याचा प्रस्ताव आहे. याच वेळी दुग्धविकास विभागाची अडीच एकर जागा कार्यशाळेसाठी मिळावी, अशी मागणी राज्य सरकारकडे करण्यात आली आहे. यावर राज्य सरकारकडून अद्याप निर्णय झालेला नाही.

शिवाजीनगर येथील एसटी स्थानकाची ३६ गुंठे जागा महामेट्रोने घेतली. या जागेच्या बाजारमूल्याएवढे एसटी स्थानक मेट्रो बांधून देईल. एसटीकडून नवीन स्थानकाचा आराखडा मिळण्याची प्रतीक्षा आहे. एसटीकडून आराखडा मिळाल्यानंतर लगेचच स्थानकाचे काम सुरू होईल. – अतुल गाडगीळ, संचालक (कार्य), महामेट्रो

शिवाजीनगर एसटी स्थानकाचा आराखडा तयार करण्याचे काम अंतिम टप्प्यात आहे. स्थानकाची रचना तळमजला आणि वर स्थानक अशी असेल. या आठवड्यात आराखडा मंजूर करून महामेट्रोकडे पाठविण्यात येईल. – विद्या भिलारकर, उपसरव्यस्थापक, एसटी महामंडळ