पुणे : राज्यातील तीर्थक्षेत्रांच्या ठिकाणी दिवसेंदिवस भाविकांची गर्दी वाढत आहे. त्यामुळे तीर्थक्षेत्र परिसरात निर्माण होणारी वाहतूक कोंडी सोडविण्यासाठी देहू-आळंदी-पंढरपूर तीर्थक्षेत्र परिसरात अत्याधुनिक बसस्थानक बांधण्यात येणार आहे. तसेच त्यावर रॅम्पची सुविधा असलेले वाहनतळ उभारण्यात येणार आहे. याशिवाय इलेक्ट्रिक वाहनांसाठी चार्जिंग सुविधाही तयार करण्यात येणार आहे.

मंत्रालयात आयोजित बैठकीत राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी हे आदेश दिले. तीर्थक्षेत्र आळंदी येथे आषाढी वारीसह वर्षभर मोठ्या प्रमाणात भाविक येतात. आलेल्या भाविकांना वाहतूक कोंडीचा सामना करावा लागू नये यासाठी पुरेशा वाहनतळाची व्यवस्था उपलब्ध असणे आवश्यक आहे. एसटी बसस्थानकांच्या इमारतीवर रॅम्पच्या सुविधेसह वाहनतळ उभारण्याचा प्रस्ताव तयार करावा. शिवाय या आराखड्यात इलेक्ट्रिक वाहनांच्या चार्जिंग सुविधेचाही समावेश करण्याची सूचना उपमुख्यमंत्र्यांनी दिल्या.

हेही वाचा – एमपीएससी उमेदवारांसाठी महत्त्वाची बातमी… मुलाखतीच्या टप्प्यावर वैद्यकीय चाचणीच्या निर्णयात बदल

हेही वाचा – पुणे : अजित पवारांचा चाकणच्या हद्दवाढीसाठी पुढाकार

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

तसेच बसस्थानक परिसरातील रस्त्यांसाठी एसटी महामंडळाची ६५२ चौरस मीटर जागा प्रस्तावित आहे. त्यासाठी एसटीला जागेच्या मोबदल्याची रक्कम जिल्हा नियोजन समितीमधून देऊन जागा नगरपालिकेला हस्तांतरित करावी. देहू-आळंदी-पंढरपूर तीर्थक्षेत्र परिसरात अत्याधुनिक बसस्थानक बांधण्यात येईल. त्यावर रॅम्पची सुविधा असलेले वाहनतळ उभारण्यात येणार असल्याचेही पवार यांनी बैठकीत सांगितले.