पुणे शहरातील खडकवासला भागात असलेल्या राष्ट्रीय संरक्षण प्रबोधिनी (एनडीए)मध्ये शिक्षण घेणार्या विद्यार्थ्याने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना घडली आहे. त्यामुळे एकच खळबळ उडाली आहे. अंतरिक्ष कुमार (वय १८; राहणार- मूळ उत्तर प्रदेश) असे आत्महत्या केलेल्या विद्यार्थ्याचे नाव आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अंतरिक्ष कुमार हा विद्यार्थी मूळचा उत्तर प्रदेशातील लखनौ येथील असून, त्याचे वडील माजी सैनिक आहेत. तर अंतरिक्षने जुलै महिन्यात पहिल्या सत्राकरिता प्रवेश घेतला होता.
आज पहाटेच्या सुमारास अंतरिक्ष कुमारने त्याच्या खोलीमध्ये गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना घडली. या आत्महत्येच्या घटनेमागील कोणतेही कारण अद्यापपर्यंत समजू शकले नसल्याचे उत्तमनगर पोलिसांनी सांगितले.