पुणे : आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार) पक्षाचे अध्यक्ष शरद पवार हे राज्यभरातील इच्छुक उमेदवारांच्या मुलाखती पुण्यातील निसर्ग मंगल कार्यालय येथे घेत आहेत. तिकिटीसाठी अनेकजण इच्छुक आहेत. यावर पक्षाच्या नेत्या सुप्रिया सुळे यांनी प्रतिक्रिया दिली. तिकीट कोणाला मिळेल याबाबत थोड्या दिवसांत कळेल, असे त्या म्हणाल्या. तसेच उमेदवार निवडीवरही त्यांनी भाष्य केले.

हेही वाचा >>> पुणे : भीक मागण्याचा बहाण्याने चोरी करणारी तरुणी गजाआड, ३५ लाखांचे दागिने जप्त; चंदननगर पोलिसांची कारवाई

Jitendra Awhad on Ajit Pawar
Jitendra Awhad: “अजित पवार मर्द असतील तर…”, जितेंद्र आव्हाड यांचे आक्षेपार्ह विधान; अजित पवार गटाचा पलटवार
Who is Madhurima Raje?
Madhurima Raje : सतेज पाटील ज्यांच्यामुळे ढसाढसा रडले…
Jayant Patil On Ajit Pawar
Jayant Patil : ‘सिंचन घोटाळ्यावरून अजित पवारांना १० वर्षे ब्लॅकमेल केलं’; त्यांची भाजपाबरोबर जाण्याची इच्छा का होती? जयंत पाटलांचा मोठा दावा
Anandrao Gedam, Armory Constituency,
“गडचिरोलीत वडेट्टीवारांचा हस्तक्षेप कधीपर्यंत सहन करणार,” माजी आमदाराचा सवाल
Sunil Tatkare On Jayant Patil
Sunil Tatkare : ‘अजित पवारांना व्हिलन ठरवण्याचा प्रयत्न केला तर…’, सुनील तटकरेंचा जयंत पाटलांना इशारा
Gopal Shetty Borivali Vidhansabha Contituency
Gopal Shetty : गोपाळ शेट्टींची बंडखोरी की माघार? फडणवीसांना भेटून आल्यानंतर भूमिका काय?
Brijbhushan Pazare warned about to commit suicide if he pressured to withdraw candidature
“उमेदवारी मागे घेण्यासाठी दबाव आणल्यास आत्महत्या करणार,” ब्रिजभूषण पाझारे यांचा इशारा
Ajit Pawar Baramati Vidhansabha
Ajit Pawar Baramati : “बारामतीत लोकसभेला ताई आणि विधानसभेला दादा असं मतदारांनी ठरवलं होतं”, अजित पवारांचं विधान चर्चेत!

लोकसभा निवडणुकीत महाविकास आघाडीला मिळालेल्या यशानंतर जी नेतेमंडळी महायुतीसोबत होती त्यापैकी अनेक नेते महाविकास आघाडीसोबत येण्यास तयार असल्याचे मागील काही दिवसांमध्ये दिसून आले आहे. शरद पवार गटामध्ये अनेक नेते येण्यास अधिक इच्छुक आहेत. इच्छुकांची संख्या मोठ्या प्रमाणावर दिसून येत असल्याने शरद पवार यांच्यासोबत सुरुवातीपासून असलेल्या पदाधिकाऱ्यांमध्ये आपल्याला उमेदवारी मिळेल की नाही, याबाबत धाकधुक आहे.

हेही वाचा >>> पिंपरी : अखेर तीन महिन्यांनी अजितदादांच्या पक्षाला बालेकिल्ल्यात मिळाला शहराध्यक्ष; ‘या’ नावावर शिक्कामोर्तब

याबाबत सुप्रिया सुळे यांना विचारले असता त्या म्हणाल्या की, जे संघर्षाच्या काळात आमच्यासोबत राहिले मी त्यांना दुखवून कुठलाही निर्णय घेणार नाही. सर्वांना उमेदवारी मागण्याचा अधिकारी असून सर्वांनी एकत्रित बसावे, चर्चा करावी. तसेच जो कोणी पक्षात येईल त्याचा मान सन्मान नक्कीच होईल, पण तिकीट कोणाला मिळेल हे थोड्याच दिवसात कळेल, अशी भूमिका त्यांनी मांडली.