MSBSHSE 10th Result महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या वतीने इयत्ता दहावीची परीक्षा २ मार्च २०२३ ते २५ मार्च २०२३ या कालावधीत घेण्यात आली होती. राज्यभरातून १५ लाख ७७ हजार २५६ विद्यार्थी बसले होते. त्यात ८ लाख ४४ हजार ११६ मुले आणि ७ हजार ३३ हजार ०६७ मुलींचा समावेश होता. ९३.८३ टक्के इतका निकाल लागला असून दहावीच्या परीक्षेत मुलींनीच बाजी मारली आहे. मुलींची उत्तीर्ण होण्याची टक्केवारी ९५.८७ टक्के तर मुलांच्या उत्तीर्णतेची टक्केवारी ९२.०५ टक्के इतकी आहे.

यामध्ये राज्यभरात १०० टक्के मार्क मिळवलेल्या विद्यार्थ्याची संख्या १५१ इतकी असून त्यामध्ये पुण्यातील ५ विद्यार्थ्यांचा समावेश आहे. टिळक रोड येथील डीईएस इंग्लिश मीडियम स्कूलचा १०० टक्के निकाल लागला आहे. त्या स्कूलमधील स्वराली राजपूरकर या विद्यार्थिनीला १०० टक्के मिळाले आहेत. त्या पार्श्वभूमीवर स्वराली राजपूरकर हिच्याशी संवाद साधला असता ती म्हणाली की, मी वर्षभर दररोज दोन ते तीन तास अभ्यास करीत राहिले. त्यामुळे मला ९५ ते ९८ च्या दरम्यान मार्क मिळतील अशी अपेक्षा होती. पण आज ऑनलाईन रिजल्ट पाहिला. त्यावेळी १०० टक्के मार्क मिळाल्याचे पाहून विश्वास बसत नव्हता.

Who will be the Chief Minister Vidhan sabha election 2024
“कोण होणार मुख्यमंत्री?” शिंदे की फणडवीस? कोणाचा पक्ष मारणार बाजी? ज्योतिषतज्ज्ञांनी सांगितली भविष्यवाणी
Ladki Bahin Yojna Sudhir Mungantiwar 2100 rs Installment
Ladki Bahin Yojna : लाडक्या बहिणींना २१०० रुपयांसाठी…
BJP workers waited four hours for Priyanka Gandhis road show
नवलचं! प्रियंका गांधींच्या ‘रोड-शो’साठी भाजपचे कार्यकर्ते चार तास प्रतीक्षेत का होते?
Aditi Tatkare
मविआतील बंडखोरी आदिती तटकरेंच्या पथ्यावर ?
maharashtra vidhan sabha election 2024 uncle dharmarao baba atram vs nephew ambrishrao atram in aheri assembly constituency gadchiroli print politics news
अहेरीत आत्राम काका-पुतण्यात थेट लढत? अपक्षांमुळे प्रस्थापितांच्या मनात धाकधूक…
Maharashtra Vidhan Sabha Nivadnuk 2024 Updates in Marathi
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : प्रचार थांबला; आता चेंडू मतदारांच्या कोर्टात, २० नोव्हेंबरची प्रतिक्षा
Maharashtra Elections Assembly Elections 2024 Election Commission
महाराष्ट्र वाहून जाणार की आपली वेगळी वाट आखणार?

हेही वाचा >>> Maharashtra SSC Result 2023: ठाणे जिल्ह्यात दहावीच्या निकालात मुलींची बाजी, यंदा ९३.६३ टक्के इतका जिल्ह्याचा निकाल

या वर्षभराच्या काळात आई, बाबा आणि सर्व शिक्षकांनी वेळोवेळी मार्गदर्शन केल्याने मला हे यश मिळविता आल्याची भावना यावेळी तिने व्यक्त केली. तसेच आता इंजिनिअरिंग किंवा मेडिकल क्षेत्रात करिअर करणार असल्याचं तिने सांगितले. या परीक्षेत काही विद्यार्थांना अपयश जरी आलं असेल तर त्या विद्यार्थ्यांनी खचून न जाता पुढील तयारीसाठी सज्ज राहण्याचे आवाहन देखील यावेळी तिने केले.