विद्यापीठात यंदापासून एक वर्षांचा पूर्णवेळ पदविका अभ्यासक्रम

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

पुणे : स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराजांच्या समग्र जीवनकार्यासह त्यांची युद्धनीती, राष्ट्रउभारणीची संकल्पना विद्यार्थ्यांना समाजावून देण्यासाठी सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाने पहिल्यांदाच स्वतंत्र अभ्यासक्रमाची निर्मिती के ली आहे. विद्यापीठाच्या संरक्षण आणि सामरिकशास्त्र विभागात पदव्युत्तर स्तरावर पहिल्यांदाच छत्रपती शिवाजी महाराजांवर आधारित एक वर्षांचा पदव्युत्तर पदविका अभ्यासक्रम यंदापासून सुरू करण्यात येत आहे.

शालेय अभ्यासक्रमात, पदवी स्तरावर  छत्रपती शिवाजी महाराज अभ्यासले जातात. आंतरराष्ट्रीय स्तरावर छत्रपती शिवाजी महाराज एक नेतृत्व, योद्धे आणि राष्ट्र निर्माते म्हणून अभ्यासले जातात. मात्र के वळ छत्रपती शिवाजी महाराज ही संकल्पना घेऊन पूर्णवेळ अभ्यासक्रमाची निर्मिती करण्यात आली नाही. ही उणीव दूर करण्यासाठी विद्यापीठाच्या संरक्षण आणि सामरिक शास्त्र विभागाचे प्रमुख डॉ. विजय खरे यांनी ‘पीजी डिप्लोमा इन छत्रपती शिवाजी महाराज अ‍ॅज ए नेशन बिल्डर’ हा अभ्यासक्रम विकसित करण्यासाठी पुढाकार घेतला. नव्या शैक्षणिक वर्षांत हा अभ्यासक्रम राबवला जाणार आहे. कोणत्याही विद्याशाखेची पदवी ही या

पदविका अभ्यासक्रमाच्या प्रवेशासाठीची अट आहे. एकू ण वीस विद्यार्थ्यांना अभ्यासक्रमाला प्रवेश दिला जाईल, त्यातील काही जागा आंतरराष्ट्रीय विद्यार्थ्यांसाठी राखीव असतील.

‘छत्रपती शिवाजी महाराजांचे विचार, समग्र कार्य विद्यार्थ्यांना समजावून देण्यासाठी पहिल्यांदाच पदव्युत्तर स्तरावर एक वर्षांचा पूर्णवेळ अभ्यासक्रम यंदापासून सुरू करण्यात येत आहे. कोणत्याही विद्यापीठात अशा प्रकारचा अभ्यासक्रम अद्याप उपलब्ध नाही. या अभ्यासक्रमाला विद्यापीठाची व्यवस्थापन परिषद, विद्या परिषदेने मान्यता दिली आहे. या अभ्यासक्रमात वर्गातील अध्यापनासह क्षेत्रभेटी, प्रकल्प आदींचा समावेश असेल,’ अशी माहिती संरक्षण आणि सामरिकशास्त्र विभागाचे प्रमुख डॉ. विजय खरे यांनी दिली.

अभ्यासक्रमातील काही महत्त्वाचे घटक

* राष्ट्रउभारणीची संकल्पना

* राज्य म्हणून विचार

* प्रशासन, युद्धनीती

* जगभरातील योद्धय़ांशी तुलनात्मक अभ्यास

* गडकिल्ले क्षेत्रभेटी

Pune News (पुणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Syllabus on chhatrapati shivaji maharaj for the first time in postgraduate class zws
First published on: 08-07-2020 at 00:49 IST