संजय जाधव

पुणे : अनेक मेट्रो स्थानकांवर प्रवाशांना वाहने उभी करण्यासाठी जागा नाही. त्यामुळे प्रवाशांची मोठी गैरसोय होत आहे. हे लक्षात घेऊन महामेट्रोकडून १२ स्थानकांवर वाहनतळ सुरू करण्यात येणार आहेत, अशी माहिती महामेट्रोचे व्यवस्थापकीय संचालक श्रावण हर्डीकर यांनी शुक्रवारी दिली.

हर्डीकर म्हणाले की, सध्या अनेक मेट्रो स्थानकांवर वाहनतळ नाहीत. त्यामुळे प्रवाशांच्या सोयीसाठी १२ स्थानकांवर वाहनतळ उभारण्यात येणार आहेत. महापालिकेकडून वाहनतळासाठी जागा उपलब्ध करून दिली जात आहे. त्या ठिकाणी वाहनतळ विकसित केले जातील. त्यातील पिंपरी-चिंचवड, संत तुकारामनगर, फुगेवाडी, शिवाजीनगर, जिल्हा न्यायालय, स्वारगेट, आयडियल कॉलनी, मंगळवार पेठ, वनाझ, रेंज हिल या ठिकाणी वाहनतळ विकसित केले जातील. भविष्यात गरवारे महाविद्यालय आणि नळ स्टॉप या स्थानकांवर वाहनतळ विकसित करण्याचे नियोजन आहे.

आणखी वाचा-पुणे: करोडपती फौजदाराला निलंबनानंतर आता शरीरसौष्ठवाचा छंद!

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

पीएमपीच्या फीडर सेवेसाठी सर्वेक्षण

मेट्रोच्या प्रत्येक स्थानकाच्या परिसरात पीएमपीएमएलकडून बस ‘फीडर सेवा’ सुरू आहे. प्रवाशांना मेट्रो स्थानकापासून इच्छित स्थळी जाण्यासाठी आणि मेट्रो स्थानकांपर्यंत पोहोचण्यासाठी फीडर सेवा आहे. यात आणखी सुधारणा करण्यासाठी प्रत्येक स्थानकनिहाय सर्वेक्षण केले जाईल. यासाठी पीएमपीएमएलची मदत घेतली जाईल, असेही हर्डीकर यांनी स्पष्ट केले.