कन्नड रक्षक वेदिकेच्या कार्यकर्त्यांनी चित्रदुर्ग येथे महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाच्या एसटीला अडवून,एसटी चालकाच्या तोंडाला काळ फासल्याची घटना घडली.या घटनेमुळे पुन्हा एकदा महाराष्ट्र आणि कर्नाटक सीमावाद चिघळण्याची शक्यता आहे.

तर पुण्यातील लक्ष्मीनारायण टॉकीजसमोरील बाजूस उभ्या असलेल्या कर्नाटक राज्यातील एसटी बसला शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या पदाधिकाऱ्यांनी काळे फासून निषेध नोंदविला आणि त्यावेळी कर्नाटक सरकार विरोधात जोरदार घोषणाबाजी देखील करण्यात आली. महाराष्ट्रातील नागरिकांवर आजवर कर्नाटक राज्यातील नेत्यांनी, स्थानिक कार्यकर्त्यांकडून वेळोवेळी अन्याय अत्याचार केल्याच्या घटना घडल्या आहेत.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

पुन्हा एकदा कर्नाटक येथील काही संघटनांनी एसटी चालकास कन्नड येत नाही म्हणून काळे फासण्यात आले आहे. त्या घटनेचा आम्ही निषेध व्यक्त करीत असून आज आम्ही कर्नाटकच्या बसला काळे फासले आहे.पण आता कर्नाटक राज्यातील नेत्यांना,कार्यकर्त्यांना इशारा देऊ इच्छितो की,यापुढे मराठी माणसावर अन्याय केला.तर कर्नाटक च्या बसेस पुणे शहरात फिरू देणार नसल्याचा इशारा शिवसैनिक सुरज लोखंडे यांनी दिला.