पुण्याच्या देवाच्या आळंदीतील धर्मांतरण प्रकरण चांगलंच चिघळले आहे. काही ख्रिश्चन धर्मीय हिंदू बांधवांच धर्मांतर करण्याचा प्रयत्न करत असल्याचं वारंवार समोर आले आहे. आळंदीत पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल आहे. या प्रकरणात आता पुण्याच्या हिंदू महासंघाने उडी घेतली आहे. धर्मांतराचा प्रयत्न करणाऱ्या आरोपींना पंधरा दिवसात बेड्या न ठोकल्यास आळंदीसह महाराष्ट्रभर आंदोलन करण्याचा इशारा आनंद दवे यांनी दिला आहे. शिवनेरी ज्याप्रमाणे आम्हाला प्रिय आहे त्याचप्रमाणे आळंदी श्रद्धस्थान असून तिथं एक ही चर्च उभा राहणार नाही याची काळजी घेऊ अस वक्तव्य आनंद दवे यांनी केलं आहे. हिंदू महासंघाने आज धर्मांतर प्रकरणी आळंदी पोलिसांना निवेदन दिले आहे. त्यानंतर आनंद दवे हे प्रसारमाध्यमांशी बोलत होते.

हेही वाचा- पिंपरी- चिंचवड रस्त्यावर उतरले यमराज; नियम पाळा अन्यथा माझ्या सोबत चला!

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

आनंद दवे म्हणाले की, आळंदीत सक्तीचे आणि फसवणुकीच्या धर्मांतराचा प्रयत्न सुरू आहे. शिक्षण न झालेल्या व्यक्तींना आर्थिक आमिष दाखवून आणि माझा देव तुझं कल्याण करेल, तुझा आजार बरा करेल असे आमिष दाखवून धर्मांतराचा प्रयत्न केला जातो आहे. हे थांबवण्यासाठी आज आम्ही आळंदी पोलीस ठाण्यात निवेदन दिले आहे. ते तपास करत आहेत. आमचा कायद्यावर विश्वास आहे. आम्ही पोलिसांना पुढील १५ दिवस देत आहोत. रीतसर तक्रार असलेल्या आरोपींना जर अटक करण्यात आली नाही. तर, आळंदीत हिंदू महासंघ तीव्र आणि मोठं आंदोलन करेल. आळंदीत एक ही चर्च उभं राहणार नाही याची काळजी हिंदू महासंघ घेईल. जशी आम्हाला शिवनेरी प्रिय आहे. तसेच आमचं श्रद्धस्थान हे आळंदी आहे. धर्मांतराच्या गुन्ह्यात पोलिसांनी कलम खूप सोपी लावलेली आहेत. ती कलम वाढवावीत यासाठी पोलिस आयुक्तांना आम्ही भेटणार आहोत. पोलिस हे प्रकरण निष्काळजी पणे हाताळत आहे. असा आरोप दवे यांनी केला आहे. पुढे ते म्हणाले की, पुण्यात एक ख्रिश्चन धर्मियांचा मोर्चा निघाला की, हिंदुत्ववादी संघटना दबाव आणत आहेत. हे ह्यांच अस आहे उलटा चोर कोतवाल को दाटे अस दवे म्हणाले आहेत.