लोकसत्ता प्रतिनिधी

पुणे: आकाशवाणी पुणे केंद्रावरून प्रसारित होणाऱ्या बातम्या छत्रपती संभाजीनगर येथे हलवण्याचा निर्णयाला माहिती प्रसारण मंत्री अनुराग ठाकूर यांनी स्थगिती दिली. त्यामुळे प्रादेशिक वृत्तविभाग बंद करण्याचा निर्णय बारगळला असल्याचे चित्र आहे.

आकाशवाणी पुणे केंद्रावरून प्रसारित होणाऱ्या बातम्या बंद करण्याचा निर्णय घेण्यात आला आणि १९ जूनपासून त्याची अंमलबजावणी होणार होती. मात्र, या निर्णयाविरोधात नाराजीचा सूर व्यक्त झाल्यानंतर सरकारला निर्णय स्थगित करून एक पाऊल मागे यावे लागले आहे. राज्यसभा खासदार आणि माजी माहिती प्रसारणमंत्री प्रकाश जावडेकर यांनी ठाकूर यांच्याशी संपर्क साधून या संदर्भात चर्चा केली. तसेच प्रसार भारतीचे अपूर्व चंद्र आणि मुख्य कार्यकारी अधिकारी द्विवेदी यांच्याशीही जावडेकर यांची चर्चा झाली.

हेही वाचा… पुणे : राष्ट्रवादी काँग्रेसच्या शहराध्यक्षांच्या भावाला जीवे मारण्याची धमकी

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

पुणे आकाशवाणी वरून प्रसारित होणाऱ्या बातम्यांचे केंद्र छत्रपती संभाजीनगरला हलवण्याचा निर्णय रद्द करावा, या संदर्भात जावडेकर यांनी चर्चा केली. त्यानंतर हा निर्णय घेण्यात आला. जावडेकर सध्या तेलंगणा दौऱ्यावर असून त्यांनी या विषयासंदर्भात अनुराग ठाकूर यांच्याशी दूरध्वनीवरून चर्चा केली.