लोकसत्ता प्रतिनिधी

पुणे: मोटारींमध्ये सीटबेल्ट बंधनकारक करण्यात आला आहे. यामुळे वाहनउत्पादक कंपन्यांनीही त्यानुसार मोटारीत उपाययोजना केल्या आहेत. मोटारीतील चालक अथवा प्रवाशांनी सीटबेल्ट परिधान न केल्यास अलार्म वाजतो. हा अलार्म रोखणाऱ्या क्लिपची ई-कॉमर्स कंपन्यांकडून सर्रास विक्री सुरू असल्याची बाब समोर आली आहे. या प्रकरणी केंद्र सरकारने पाच कंपन्यांवर कारवाईचे पाऊल उचलले आहे.

pune ola uber marathi news
ओला, उबरचे काय होणार? जिल्हाधिकाऱ्यांच्या निर्णयाविरोधात लवादाकडे धाव
Looking for a job Elon Musk is hiring engineers designers and more at artificial intelligence AI company xAI
एलॉन मस्कच्या कंपनीत काम करायचयं? ‘या’ पदांसाठी होणार भरती; कंपनीची ‘ही’ पोस्ट वाचलात का?
jharkhand marathi news, logistic company fraud
झारखंडमधील कंपनीची पावणेसहा कोटींची फसवणूक, लॉजिस्टीक कंपनीच्या तिघांविरोधात गुन्हा
Apple Company has decided to fires 600 employees in California
‘ॲपल’कडून ६०० कर्मचाऱ्यांना नारळ; कंपनीकडून करोनानंतरची पहिलीच मोठी कर्मचारी कपात

ग्राहक संरक्षण कायदा २०१९ चे पाच ई-कॉमर्स कंपन्यांनी उल्लंघन केल्याचा ठपका ठेवण्यात आला आहे. याबाबत केंद्रीय ग्राहक संरक्षण प्राधिकरणाने सीटबेल्ट अलार्म थांबवणाऱ्या क्लिपची विक्री करणाऱ्या ॲमेझॉन, फ्लिपकार्ट, स्नॅपडील, शॉपक्ल्यूज आणि मिशो या पाच कंपन्यांवर कारवाईचे पाऊल उचलले आहे. या क्लिपमुळे मोटारीतील व्यक्तीने सीटबेल्ट परिधान केला नाही, तरी अलार्म वाजत नाही. ह्या प्रकारे ग्राहकाचे आयुष्य आणि त्याच्या सुरक्षिततेशी कंपन्यांनी केलेली तडजोड आहे, असे प्राधिकरणाने म्हटले आहे.

हेही वाचा… तळेगाव दाभाडे : आधी पिस्तुलातून गोळ्या झाडल्या, मग कोयत्याने १८ वार केले, किशोर आवारेंची निर्घृण हत्या

प्राधिकरणाच्या मुख्य आयुक्त निधी करपे यांनी या प्रकरणी कारवाईचा आदेश दिला. रस्ते वाहतूक व महामार्ग मंत्रालयाने ग्राहक कल्याण मंत्रालयाला पाठविलेल्या पत्रातून हा सीटबेल्ट अलार्म स्टॉपर क्लिपची विक्री सुरू असल्याचा मुद्दा समोर आला होता. यानंतर प्राधिकरणाने केलेल्या तपासणीत ई-कॉमर्स कंपन्यांच्या मंचावर या क्लिपची राजरोस विक्री सुरू असल्याचे निदर्शनास आले. काही कंपन्या बॉटल ओपनर आणि सिगारेट लायटरच्या नावाखाली या क्लिपची विक्री करीत होत्या.

हेही वाचा… अबब…बॅटरी सहा हजार वर्षे टिकणार? पुण्यातील डिफेन्स इन्स्टिट्यूट ऑफ ॲडव्हान्स्ड टेक्नॉलॉजीमध्ये संशोधन

प्राधिकरणाने या सर्व ई-कॉमर्स कंपन्यांना तातडीने क्लिप त्यांच्या मंचावरून काढून टाकण्याचे निर्देश दिले. त्याचबरोबर ग्राहक आणि जनतेच्या सुरक्षिततेशी तडजोड करीत असलेले मोटारींचे भाग विकण्यास मनाई करण्यात आली. क्लिप आणि मोटारींशी निगडित इतर अवैध उपकरणांची विक्री करणाऱ्या विक्रेत्यांची यादी आणि त्यांच्यावर केलेल्या कारवाईचा तपशील सादर करण्याचे निर्देशही प्राधिकरणाने ई-कॉमर्स कंपन्यांना दिले. त्यांनी सादर केलेल्या अहवालानुसार १३ हजार ११८ कंपन्यांच्या सीटबेल्ट अलार्म स्टॉपर क्लिपची विक्री थांबवण्यात आली आहे.

सीटबेल्ट नसल्याने १६ हजार जणांचा मृत्यू

रस्ते व महामार्ग मंत्रालयाच्या माहितीनुसार, सीटबेल्ट परिधान न केल्यामुळे अपघातात २०२१ मध्ये १६ हजार जणांचा मृत्यू झाला. त्यातील आठ हजार ४३८ चालक, तर सात हजार ९५९ प्रवासी होते. याचबरोबर ३९ हजार हजार २३१ जण सीटबेल्ट परिधान न केल्यामुळे जखमी झाले आहेत. त्यातील १४ हजार ४१६ चालक आणि २२ हजार ८१८ प्रवासी आहेत.

…तर विमा संरक्षणाला मुकाल

मोटारीमध्ये सीटबेल्ट अलार्म स्टॉपर क्लिपचा वापर केल्यास ग्राहकांना अपघाती विमा संरक्षण मिळण्यात अडचणी येऊ शकतात. अशा क्लिप वापरून ग्राहकाने हलगर्जीपणा केल्याचा ठपका ठेवत विमा कंपनी विमा संरक्षण नाकारू शकते.