पुणे: काळजी घेण्यासाठी असलेला मुलगा (केअर टेकर) डबा आणायला घराबाहेर गेल्यानंतर वृद्धाने गॅलरीतून उडी मारून आत्महत्या केल्याचा प्रकार कोथरूडमधील मयूर कॉलनी येथे घडला.

आत्महत्या केलेल्या वृद्ध नागरिकाचा एक मुलगा मुंबईला असून दोन मुलगे अमेरिकेत स्थायिक आहेत. तीन मुलगे परगावी असलेले हे ज्येष्ठ नागरिक घरामध्ये एकटेच राहत होते. त्यांची काळजी घेणारा मुलगा डबा आणण्यासाठी घराबाहेर पडला. त्यानंतर ज्येष्ठ नागरिकाने गॅलरीतून उडी मारून आत्महत्या केली. त्यांचे नाव अद्याप समजू शकले नाही. पोलीस तातडीने घटनास्थळी रवाना झाले आहेत.

हेही वाचा… टाकाऊ रेल्वे डब्यातून साकारले उपाहारगृह

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

वृद्ध गॅलरीतून उडी मारत असताना खाली बसलेल्या लोकांनी त्यांना आवाज देऊन थांबविण्याचा प्रयत्न केला. मात्र, तोपर्यंत त्यांनी उडी मारण्याचे पाऊल उचलले होते. कोथरूड मयूर कॉलनी येथील दुपारी एकच्या सुमारास ही घटना घडली.