scorecardresearch

पुणे म्हाडा योजनेसाठी अर्ज भरण्याची प्रक्रियेला लवकरच सुरुवात; मात्र, यंदा वेटिंग लिस्ट रद्द

म्हाडाची आज पुणे येथील लॉटरीसाठी अर्ज भरण्याची सुरुवात होणार आहे.

mhada
( संग्रहित छायचित्र )

पुणे म्हाडातर्फे योजनेसाठी लवकरच ऑनलाईन अर्ज नोंदणी आणि अर्ज भरणा प्रक्रिया सुरु होणार आहे. याबाबत गृहनिर्माण मंत्री जिंतेद्र आव्हाड यांनी ट्वीटद्वारे माहिती दिली आहे. मात्र, यावेळी लॉटरीमध्ये वेटिंग लिस्ट असणार नाही. वेटिंग लिस्टमुळे भ्रष्टाचाराचे प्रमाण वाढले होते म्हणून वेटिंग लिस्ट रद्द करण्याचा निर्णय घेण्यात आल्याची माहिती आव्हाड यांनी दिली.

वेटिंग लिस्टमुळे भ्रष्टाचारात वाढ

म्हाडाची आज पुणे येथील लॉटरीसाठी अर्ज भरण्याची सुरुवात होणार आहे. मागच्या दोन ते अडीच वर्षांमध्ये करोनाची परिस्थिती होती. तरीही पुणे, औरंगाबाद, नाशिक, मुंबई या ठिकाणी मध्यमवर्गीयांना परवडणारी घरे लॉटरीच्या माध्यमातून उपलब्ध करून देण्याच काम म्हाडामार्फत झाले आहे. पण यापुढे लॉटरीमध्ये वेटिंग लिस्ट असणार नाही. वेटिंग लिस्ट हे लॉटरी मागील भ्रष्टाचाराचे कारण होते. ते आता बंद!’ असे ट्विट आव्हाड यांनी केले आहे.

मराठीतील सर्व पुणे ( Pune ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 25-06-2022 at 16:59 IST
ताज्या बातम्या