पुणे : रेल्वे मंत्रालयाने स्थानकांचा विकास करण्यासाठी अमृत भारत स्थानक योजना राबवण्यास सुरुवात केली आहे. या अंतर्गत देशभरातील एक हजार ३०९ स्थानकांचा कायापालट केला जाणार आहे. यात पुण्यासह लोणावळा, दौंड, कोल्हापूर, सातारा, सांगली आणि इतर स्थानकांचा समावेश आहे.

केंद्र सरकारने अमृत भारत स्थानक योजना राबवण्यास सुरुवात केली आहे. या योजनेंतर्गत देशभरात एक हजार ३०९ स्थानकांचा विकास केला जाणार आहे. यात पुण्यासह अकोला, भुसावळ, चंद्रपूर, कोल्हापूर, दादर, गुलबर्गा, जळगाव, कल्याण, कुर्ला, मलकापूर, मुंबई छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस, नागपूर, नाशिक रोड, सोलापूर, ठाणे, वर्धा, लोणावळा, मनमाड, अमरावती, मिरज, अहमदनगर, माथेरान, चाळीसगाव, देवळाली, शेगाव, कराड, सांगली, दादर, वांद्रे टर्मिनस, मुंबई सेंट्रल, धरणगाव या स्थानकांचा समावेश आहे.

हेही वाचा – राज्यात पुढील दोन दिवस मुसळधार, रत्नागिरी, रायगडला ‘रेड अलर्ट’

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

या योजनेत स्थानकांचा कायापालट केला जाणार आहे. यामुळे या स्थानकांचा चेहरामोहरा बदलणार आहे. दीर्घकालीन दृष्टिकोनातून स्थानकांचा विकास करण्यावर यात भर दिला जाणार आहे. स्थानकांचा दीर्घकालीन विकास आराखडा तयार करून सुविधांचे नियोजन केले जाणार आहे. प्रत्येक स्थानकाचा विकास करताना तेथील रोजची सरासरी प्रवासी संख्या लक्षात घेऊन नियोजन करण्यात येणार आहे. याचबरोबर स्थानकाची सध्याची रचनाही विचारात घेतली जाणार आहे. प्रामुख्याने प्रवासीकेंद्रित सुविधा स्थानकांवर विकसित केल्या जातील. स्थानकाच्या बाह्य रुपासोबत अंतर्गत भागातही सुधारणा केल्या जाणार आहेत.

हेही वाचा – सावधान! पुण्यात डेंग्यूचा कहर सुरूच

कशा पद्धतीने होणार विकास?

  • स्थानक परिसरातील वाहतूक सुधारणा
  • स्थानक परिसराचे सुशोभीकरण
  • स्थानक प्रवेशद्वारांचा विकास
  • स्थानकावर प्रतीक्षागृहांची उभारणी
  • स्वयंचलित जिन्यांची उभारणी
  • स्थानकातील अंतर्गत रचनेत सुधारणा
  • स्वच्छतागृहांमध्ये सुधारणा
  • एक देश, उत्पादन योजनेंतर्गत विक्री केंद्र
  • मोफत वाय-फाय किऑस्क