पुणे: जिल्ह्याच्या ग्रामीण भागातील सीएनजी पंप चालकांना मिळालेल्या उत्पन्नातील हिस्सा (कमिशन) मिळत नसल्याने पंप बेमुदत बंद ठेवण्याचा इशारा पेट्रोल डीलर्स असोसिएशनने दिला होता. त्यावर संबंधित खासगी कंपनीला उत्पन्नातील हिस्सा देण्याचे आदेश राज्याच्या अन्न नागरी पुरवठा व संरक्षण विभागाने दिले आहेत. त्यामुळे आठ दिवसांसाठी संप पुढे ढकलण्यात आला आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

हेही वाचा >>> पुणे: लष्कराच्या दक्षिण कमांड प्रमुखपदी लेफ्टनंट जनरल अजय कुमार सिंह

सीएनजी पंप ठेवण्याबाबत यापूर्वीही बंदची हाक देण्यात आली होती. तसेच महामार्गांवरील पंप बंद ठेवण्यात आले होते. पुणे आणि पिंपरी-चिंचवड महापालिका क्षेत्रात महाराष्ट्र नॅचरल गॅस लिमिटेडने (एमएनजीएल) ६० पैसे वितरकांचे कमिशन वाढवले. मात्र, खासगी कंपनीने ते कमिशन अजूनही वाढवलेले नाही. त्यामुळे पंप चालकांनी संपावर जाण्याचा निर्णय घेतला होता. तेल कंपन्यांनी वितरक आणि संबंधित खासगी कंपनी यांच्यात समेट घडविण्यासाठी प्रयत्न सुरू केले. मात्र, त्याचा काही उपयोग झाला नाही.

हेही वाचा >>> ब्रिटनमधील प्रख्यात ‘वेलिंग्टन’ची भारतातील पहिला शाळा पुण्यात

दरम्यान, ग्रामीण भागात एकूण ४८ सीएनजी पंप असून, त्यातील आठ पंप हे संबंधित खासगी कंपनीच्या मालकीचे आहेत. त्यामुळे हे वगळून उर्वरित ४० पंपचालकांनी बेमुदत बंदचा इशारा दिला होता. मात्र, राज्याच्या अन्न नागरी पुरवठा व संरक्षण विभागाने संबंधित खासगी कंपनीच्या संचालकांना पत्र पाठवले आहे. त्यात कमिशन देण्याच्या सूचना केल्या आहेत. त्यावर पंप चालकांनी संप आठ दिवसांसाठी पुढे ढकलले आहे. कमिशन न मिळाल्यास पुन्हा १० नोव्हेंबरापासून संपावर जाण्याचा इशारा पंप चालकांनी दिला आहे, अशी माहिती पेट्रोल डीलर्स असोसिएशनचे अध्यक्ष ध्रुव रुपारेल यांनी दिली.

Pune News (पुणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: The strike cng pump drivers in the district has been postponed pune print news ysh
First published on: 02-11-2022 at 15:03 IST