पुणे : ब्रिटनमधील शिक्षण क्षेत्राच्या केंद्रस्थानी १८५६ पासून अढळ असलेल्या वेलिंग्टन कॉलेजतर्फे भारतातील पहिली शाळा पुण्यात सुरू करण्यात येत आहे. ‘ऑक्सफर्ड ऑफ द ईस्ट’ असा पुणे शहराचा असलेला लौकिक, परदेशात जाऊन शिक्षण घेण्यात अग्रक्रमावर असलेल्या भारतीयांमध्ये पुणेकरांचे असलेले वरचे स्थान या बाबींमुळे भारतातील शैक्षणिक क्षेत्रात प्रवेश करण्यासाठी पुण्याची निवड करण्यात आल्याचे वेलिंग्टन कॉलेज युकेतर्फे स्पष्ट करण्यात आले आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

हेही वाचा >>> पुणे: लष्कराच्या दक्षिण कमांड प्रमुखपदी लेफ्टनंट जनरल अजय कुमार सिंह

‘वेलिंग्टन कॉलेज’ असे नाव असले तरी १३ ते १८ वर्ष वयाच्या मुलांच्या शिक्षणामध्ये या संस्थेने आपला ठसा उमटवला आहे. भारतातील डेहराडून आणि नवी दिल्ली येथील शैक्षणिक वर्तुळात १९९६ पासून कार्यरत असलेल्या युनिसन समूहाबरोबर भागीदारीमधून वेलिंग्टन कॉलेज इंटरनॅशनल पुणे सुरू करण्यात येणार आहे. युनिसन समूहाचे अनुज अगरवाल आणि वेलिंग्टन कॉलेज इंटरनॅशनल पुणेचे फाउंडिंग मास्टर डॉ. मरे टॉड यांनी मंगळवारी पत्रकारांशी बोलताना याबाबत माहिती दिली.

हेही वाचा >>> पुणे: प्रशासकीय अधिकाऱ्याचा रिपब्लिकन पक्षामध्ये प्रवेश; अल्पसंख्याक आघाडीच्या प्रदेश उपाध्यक्षपदी निवड

अनुज अगरवाल म्हणाले,की देशातील शिक्षणाचे प्रमुख केंद्र असा लौकिक असलेल्या पुणे शहरात वेलिंग्टनसारख्या जगप्रसिद्ध संस्थेबरोबर भागीदारीतून पाऊल ठेवणे आमच्यासाठी अभिमानास्पद आहे. खराडी येथे सुमारे साडेनऊ एकर एवढ्या प्रशस्त आवारात सर्वोत्तम आंतरराष्ट्रीय सुविधांनी युक्त शाळा २०२३ पासून सुरू होणार आहे. महाराष्ट्र शासनाच्या सर्व नियमांचे पालन करुन ही शाळा काम करेल. प्राथमिक टप्प्यात दोन ते नऊ वर्षे वयाच्या मुलांसाठी आणि टप्प्याटप्प्याने १२ वर्षे वयाच्या मुलांसाठी आंतरराष्ट्रीय गुणवत्तेचे शिक्षण उपलब्ध करून देणार असल्याचे अगरवाल यांनी स्पष्ट केले. डॉ. मरे टॉड म्हणाले,की ब्रिटन, चीन आणि बँकॉक नंतर भारतातील शैक्षणिक क्षेत्रात प्रवेश करताना शिक्षण ही आनंददायी प्रक्रिया असावी, पाठ्यपुस्तकातील शिक्षणाबरोबरच मुलांच्या सर्वांगीण विकासाला चालना देणारे, आंतरराष्ट्रीय स्पर्धेत टिकणारी गुणवत्ता निर्माण करणारे शैक्षणिक वातावरण मुलांना देणे, हा या शाळेचा उद्देश आहे.

Pune News (पुणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: The first school of famous wellington in britain in india in pune pune print news ysh
First published on: 02-11-2022 at 14:59 IST