घराचे कुलुप बनावट चावीने उघडून चोरट्यांनी कपाटातील दोन लाख ९५ हजारांचे सोन्याचे दागिने लांबविल्याची घटना कात्रज भागात घडली.
हेही वाचा >>> पुणे : भात उत्पादक शेतकऱ्यांना कामगंध सापळा ठरतोय वरदान
याबाबत एका ज्येष्ठ महिलेने भारती विद्यापीठ पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. तक्रारदार महिला बिबवेवाडीत राहायला असून त्याचे कात्रज भागातील शेलारमळा परिसरात घर आहेत. चोरट्यांनी बनावट चावीने घराचे कुलुप उघडले. कपाटातील दोन लाख ९५ हजारांचे सोन्याचे दागिने लांबवून चोरटे पसार झाले. घरातून ऐवज चोरीला गेल्याचे लक्षात आल्यानंतर महिलेनने नुकतीच पोलिसांकडे तक्रार दिली.
This quiz is AI-generated and for edutainment purposes only.
ज्येष्ठ महिलेच्या घरात चोरी करणारे चोरटे माहितगार असल्याचा संशय पोलिसांनी व्यक्त केला असून सहायक पोलीस निरीक्षक घावटे तपास करत आहेत.