पिंपरी- चिंचवडमध्ये आईने रागावल्याने तेरा वर्षीय मुलाने गळफास घेऊन आत्महत्या केली. जतीन सोमनाथ कुदळे असे आत्महत्या केलेल्या मुलाचे नाव आहे. जतीन इयत्ता आठवीत शिक्षण घेत होता. जतीन अभ्यास करत नसल्याने त्याची आई त्याला रागावली. याच रागातून त्याने गळफास घेऊन आत्महत्या केली. जतीन ला तातडीने रुग्णालयात घेऊन जाण्यात आलं. उपचारादरम्यान मृत्यू झाला. ही घटना ३१ जानेवारीची असून १ फेब्रुवारी ला जतीन चा मृत्यू झाला आहे.

आताची मुले हळवी झाली आहेत. त्यांच्या मनावर मोबाईल आणि टेलिव्हिजन चा खोलवर परिणाम झाल्याचं दिसत आहे. पिंपरी- चिंचवडमध्ये आईने मुलाला अभ्यास करण्यावरून रागावल्याने आत्महत्या केली आहे. जतीन सोमनाथ कुदळे या आठवीत शिकणाऱ्या मुलाने हे टोकाचं पाऊल उचलले आहे. ३१ जानेवारी रोजी सायंकाळी पाच च्या सुमारास जतीन ची आई त्याला अभ्यास करण्यावरून रागावली. मग, त्याची आई मुलीला ट्यूशन ला सोडायला गेली. याच दरम्यान जतीन एकटा असताना घराचा दरवाजा बंद करून गळफास घेतला. त्याच वेळेत वडील आले, समोरील दरवाजा ठोठावला पण आतून प्रतिसाद येत नसल्याने पाठीमागील दरवाजाच्या सापटीतून पाहिलं. मुलाने गळफास घेतला असून त्याचे पाय जमिनीवर टेकत असल्याचे दिसले. वडिलांनी तातडीने दरवाजाच्या आतून हात घालून कडी उघडली. जतीन ला तात्काळ महानगर पालिकेच्या रुग्णालयात दाखल करण्यात आलं. काही तासांच्या उपचारादरम्यान जतीन चा मृत्यू झाला आहे. अशी माहिती पिंपरी पोलिसांनी दिली आहे.

father beaten
वसई : मुलीचे अपहरण केल्यानंतर पित्याला बेदम मारहाण, नया नगर पोलीस ठाण्यात दोघांविरोधात गुन्हा
A youth from Nalasopara committed suicide by consuming poison due to cyber fraud
सायबर भामट्यांनी घातला २ लाखांचा गंडा; वडील रागावतील म्हणून मुलाची आत्महत्या
Bail
अयोग्य स्पर्श केल्याने महिलेकडून एकाची हत्या; तीन वर्षांचा कारावास भोगल्यानंतर कोर्ट म्हणतं, “स्वसंरक्षणार्थ…”
A minor girl commits suicide due to not being able to bear the pain of menstruation Mumbai
मुंबई: मासिक पाळीचा त्रास सहन न झाल्याने अल्पवयीन मुलीची आत्महत्या