scorecardresearch

पुणे : दारू पिण्यास मनाई केल्याने जीवे मारण्याची धमकी ; तिघांविरुद्ध गुन्हा दाखल

कोथरुडमधील भुसारी काॅलनी परिसरात शिवदत्त प्लाझा इमारतीजवळ तिघे जण दारू पित होते.

पुणे : दारू पिण्यास मनाई केल्याने जीवे मारण्याची धमकी ; तिघांविरुद्ध गुन्हा दाखल
( संग्रहित छायचित्र )

पुणे : दारू पिण्यास मनाई केल्याने एकास जीवे मारण्याची धमकी दिल्याची घटना कोथरुड भागात घडली. या प्रकरणी तिघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत ऋषिकेश भास्कर यशाेदे (वय ४३, रा. ग्लोरिया ग्रास, पौड रस्ता) यांनी कोथरुड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. कोथरुडमधील भुसारी काॅलनी परिसरात शिवदत्त प्लाझा इमारतीजवळ तिघे जण दारू पित होते.

त्या वेळी यशोदे यांनी सोसायटीच्या आवारात दारू पिऊ नका, असे तिघांना सांगितले. ‘आम्हाला ओळखले नाही का?, आम्ही गंभीर गुन्ह्यातील आरोपी आहोत’ असे म्हणत तिघांनी यशोदे यांना पिस्तुलातून गोळी झाडून जीवे मारण्याची धमकी दिली, असे यशोदे यांनी फिर्यादीत म्हटले आहे. पोलीस उपनिरीक्षक राठाेड तपास करत आहेत.

मराठीतील सर्व पुणे ( Pune ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

संबंधित बातम्या