पुणे : महिलेचा विनयभंग करणाऱ्या एकास प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी जे. एम. चौहान यांनी तीन महिने साधा कारावास आणि दहा हजार रुपये दंडाची शिक्षा सुनावली.

ज्ञानेश्वर गुलाब तुरे (वय ४५, रा. सीमा सागर सोसायटी, सुखसागरनगर, कात्रज) असे शिक्षा सुनावलेल्याचे नाव आहे. याबाबत एका महिलेने फरासखाना पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पीडित महिलेच्या पतीचे निधन झाले आहे. आरोपी तुरेने महिलेच्या असहाय्यतेचा फायदा घेतला. त्याने मोबाईलवर अश्लील संभाषण करून विनयभंग केल्याची तक्रार पीडित महिलेने पोलिसांकडे केली होती.

हेही वाचा – पुणे : स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या तरुणाचे अपहरण; राजेंद्रनगर परिसरातील घटना

हेही वाचा – पुणे : ज्येष्ठ महिलेच्या चेहऱ्यावर रंग टाकून ८० हजारांचे दागिने हिसकावणारा चोरटा गजाआड

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

तत्कालीन सहायक निरीक्षक आबाजी फुके यांनी या प्रकरणाचा तपास करून आरोपीविरुद्ध न्यायालयात दोषारोपपत्र दाखल केले होते. या खटल्यात सरकार पक्षाकडून सहायक सरकारी वकील ॲड. वर्षा असलेकर यांनी बाजू मांडली. साक्ष तसेच पुरावे ग्राह्य धरून प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी जे. एम. चौहान यांनी आरोपी तुरेला तीन महिने साधा कारावास आणि दहा हजार रुपये दंडाची शिक्षा सुनावली. दंड न भरल्यास तुरेला एक महिने कारावास भोगावा लागणार आहे. फरासखाना पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक दादासाहेब चुडाप्पा, गुन्हे शाखेचे निरीक्षक मंगेश जगताप यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक गजानन शिंदे, हवालदार सुनील नाईक यांनी न्यायालयीन कामकाजात सहाय केले.