मार्केट यार्डातील घाऊक बाजारात फळभाज्यांची आवक वाढली आहे. मात्र, मागणी वाढल्याने टोमॅटो, हिरवी मिरची, घेवड्याच्या दरात वाढ झाली. शेवगा आणि तोतापुरी कैरीच्या दरात घट झाली. अन्य फळभाज्यांचे दर स्थिर असल्याची माहिती व्यापाऱ्यांनी दिली. गुलटेकडी येथील श्री छत्रपती शिवाजी मार्केट यार्डात रविवारी (५ मार्च) राज्य तसेच परराज्यांतून १०० ट्रक फळभाज्यांची आवक झाली.

हेही वाचा >>> ’आयआरसीटीसी’च्या बनावट संकेतस्थळाच्या माध्यमातून ज्येष्ठाला साडेतीन लाखांना गंडा

आंध्र प्रदेश, कर्नाटकमधून मिळून ८ ते १० टेम्पो हिरवी मिरची, गुजरात, कर्नाटकमधून मिळून ३ ते ४ टेम्पो कोबी, राजस्थानातून ७ ते ८ टेम्पो गाजर,आंध्रप्रदेश आणि तामिळनाडूतून मिळून ४ ते ५ टेम्पो शेवगा, मध्य प्रदेशातून मिळून ११ ते १२ टेम्पो मटार, गुजरातमधून २ टेम्पो भुईमूग शेंग, कर्नाटकातून ४ ते ५ टेम्पो घेवडा, आंध्रप्रदेश आणि कर्नाटकातून मिळून तोतापुरी कैरी ५ ते ६ टेम्पो, बंगळुरूतून १ टेम्पो आले, मध्य प्रदेश आणि गुजरातमधून मिळून १५ ते १६ ट्रक लसूण, आग्रा, इंदूर तसेच पुणे विभागातून मिळून ५० ट्रक बटाटा आवक परराज्यांतून झाली, अशी माहिती घाऊक बाजारातील प्रमुख अडते विलास भुजबळ यांनी दिली.

हेही वाचा >>> पुणे : चंदन चोरट्याला पकडले चार गुन्हे उघड

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

पुणे विभागातून सातारी आले ९०० ते १००० गोणी, टोमॅटो ११ ते १२ हजार पेटी, भेंडी ५ ते ६ टेम्पो, गवार ५ ते ६ टेम्पो, हिरवी मिरची ४ ते ५ टेम्पो, फ्लॉवर १० ते १२ टेम्पो, कोबी ५ ते ६ टेम्पो, ढोबळी मिरची १० ते १२ टेम्पो, तांबडा भोपळा ८ ते १० टेम्पो , कांदा ७० ते ८० ट्रक अशी आवक झाली.