लोकसत्ता प्रतिनिधी

पुणे : शहरात झालेल्या मुसळधार पावसामुळे दहा ठिकाणी झाडे पडण्याच्या घटना घडल्या. झाडांच्या फांद्या रस्त्यात पडल्याने वाहतूक विस्कळीत झाली. अग्निशमन दलाच्या जवानांनी फांद्या हटवून रस्ते वाहतुकीस मोकळे करून दिले.

शहर परिसरात शुक्रवारी दुपारी तीननंतर मुसळधार पाऊस सुरू झाला. पावसामुळे कोंढव्यातील शीतल पेट्रोल पंप, धायरी, भवानी पेठ, एरंडवणे अग्निशमन केंद्राच्या परिसरात, येरवड्यातील सादलबाब चौक, लोहियानगर, कोथरूडमधील गिरीजा शंकर सोसायटी, स्वारगेट परिसरातील वेगा सेंटर, स्वारगेट पोलीस वसाहतीत झाडे पडली. येरवड्यात झाड पडल्याने एका मोटारीचे नुकसान झाले.

आणखी वाचा-मतदानाच्या पार्श्वभूमीवर शिरूरमधील ‘या’ बँकांवर पोलिस बंदोबस्त ठेवा, डॉ. अमोल कोल्हेंची मागणी

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

अग्निशमन दलाच्या जवानांनी घटनास्थळी धाव घेऊन तातडीने मदतकार्य सुरू केले. रस्त्यात पडलेल्या झाडांच्या फांद्या हटवून रस्ते वाहतुकीस मोकळे करून देण्यात आले. दुपारी पाऊस सुरू झाल्यानंतर तासाभरात दहा ठिकाण झाडे पडण्याच्या घटना घडल्या, अशी माहिती अग्निशमन दलाने दिली.