पुणे : दांडेकर पूल परिसरात तरुणावर शस्त्राने वार खुनाचा प्रयत्न केल्याप्रकरणी दोघे अटकेत | Two arrested for attempting to kill a youth at dandekar bridge area pune print news amy 95 | Loksatta

पुणे : दांडेकर पूल परिसरात तरुणावर शस्त्राने वार खुनाचा प्रयत्न केल्याप्रकरणी दोघे अटकेत

दांडेकर पूल परिसरात वैमनस्यातून तरुणावर तीक्ष्ण शस्त्राने वार करण्यात आल्याची घटना घडली.

पुणे : दांडेकर पूल परिसरात तरुणावर शस्त्राने वार खुनाचा प्रयत्न केल्याप्रकरणी दोघे अटकेत
प्रतिनिधिक छायाचित्र

दांडेकर पूल परिसरात वैमनस्यातून तरुणावर तीक्ष्ण शस्त्राने वार करण्यात आल्याची घटना घडली. या प्रकरणी दोघांना अटक करण्यात आली असून साथीदारांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

आकाश देवरुखे (वय २२, रा. दांडेकर पूल, सिंहगड रस्ता) असे जखमी झालेल्याचे नाव आहे. या प्रकरणी मनोज उर्फ मन्या दिने्श मेरवाडे (रा. दांडेकर पूल, सिंहगड रस्ता), ऋतिक शरद सोनवणे (रा. दत्तवाडी) यांना अटक करण्यात आली. या प्रकरणी त्यांच्या बरोबर असलेल्या साथीदारा विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. देवरुखे याने या संदर्भात दत्तवाडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

देवरुखे आणि त्याचा मित्र अनिल शिंदे (रा. कोथरुड) दांडेकर पूल परिसरात गप्पा मारत थांबले होते. देवरुखेची मेरवाडे, सोनवणेशी भांडणे झाली होती. आरोपी मेरवाडे, सोनवणे आणि साथीदाराने त्याला शिवीगाळ केली. जीवे मारण्याची धमकी दिली. त्याच्यावर कोयत्याने वार करुन आरोपी पसार झाले. पोलिसांनी पसार आरोपींना अटक केली. पोलीस उपनिरीक्षक एस. बी. लोहार तपास करत आहेत.

मराठीतील सर्व पुणे ( Pune ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 01-07-2022 at 14:42 IST
Next Story
पुणे : कात्रज परिसरात अपघात दोन दुचाकीस्वारांचा मृत्यू ; दुचाकीवरील दोघे जखमी