पुणे : पुणे, पिंपरी चिंचवड महानगरपालिका कार्यक्षेत्रांतर्गत अकरावी केंद्रीय प्रवेश प्रक्रियेची दुसरी अंतिम गुणवत्ता यादी जाहीर झाली आहे. या फेरीत १८ हजार ७२६ विद्यार्थ्यांना प्रवेश जाहीर झाला असून, आता १२ जुलै रोजी सायंकाळी सहा वाजेपर्यंत विद्यार्थ्यांना प्रवेश घेता येणार आहे.

इयत्ता अकरावी केंद्रीय प्रवेश प्रक्रिया सदस्य सचिव डॉ. ज्योती परिहार यांनी ही माहिती दिली. दुसऱ्या प्रवेश फेरीत कॅप अंतर्गत ७२ हजार ८१४ जागांसाठी ४९ हजार ८४८ विद्यार्थ्यांनी नोंदणी केली होती. त्यातील १८ हजार ७२६ विद्यार्थ्यांना प्रवेश जाहीर झाला. कला शाखेसाठी १ हजार ७५०, वाणिज्य शाखेसाठी ७ हजार २७८, विज्ञान शाखेसाठी ९ हजार ३९८, तर व्यावसायिक शिक्षण शाखेसाठी ३०० विद्यार्थ्यांना प्रवेश जाहीर झाला आहे.

हेही वाचा…आंतरधर्मीय विवाह करणाऱ्या बहिणीच्या पतीची भावाने केली हत्या; असा रचला कट आणि काढला काटा

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

प्रवेश जाहीर झालेले विद्यार्थी प्रवेशासाठी संबंधित विद्यालयात गेल्यास त्यांना कागदपत्रांअभावी प्रवेश नाकारण्यात येऊ नये, हमीपत्राद्वारे त्यांना प्रवेश देण्यात यावा. नोंदणी आणि प्रवेश अर्जाचा भाग एक भरायचा असलेल्या विद्यार्थ्यांना त्याबाबतची सूचना प्रवेश संकेतस्थळावर उपलब्ध करून देण्यात आली आहे. घेतलेला प्रवेश रद्द करायचा असल्यास संबंधित विद्यालयास विनती करून प्रवेश रद्द करता येईल, अशी माहिती देण्यात आली.