पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाने (पुणे मेट्रो पोलिटन रिजन डेव्हलपमेंट ॲथॉरिटी – पीएमआरडीए) आचार्य आनंदऋषीजी चौकातील (सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठासमोरील) दुमजली उड्डाणपुलाच्या कामाचा बृहत आराखडा तयार केला आहे. त्यानुसार नोव्हेंबर २०२४ पर्यंत या पुलाचे काम पूर्ण होणार होते. मात्र, हा कालावधी कमी करून नवीन तंत्रज्ञानाच्या साहाय्याने जानेवारी २०२४ मध्येच हे काम पूर्ण करण्याचे लक्ष्य ठेवण्यात आले आहे. त्याकरिता पीएमआरडीएने तांत्रिक सल्लागाराद्वारे उड्डाणपूल उभारणाऱ्या टाटा कंपनीला जानेवारी २०२४ पर्यंत काम पूर्ण करण्याचे आदेश देऊन सुधारित बांधकाम आराखडा मागविला आहे.

हेही वाचा >>>प्रकाश आंबेडकर यांची शनिवारी पिंपरीत सभा

पुणे एकीकृत महानगर परिवहन प्राधिकरण (पुणे युनिफाइड मेट्रोपोलिटन ट्रान्सपोर्ट ॲथॉरिटी – पुम्टा), महानगरपालिका आणि वाहतूक पोलीस आदी विभागातील अधिकाऱ्यांची संयुक्त बैठक पार पडली. या बैठकीत वाहतूककोंडीच्या दृष्टिकोनातून उड्डाणपुलाचे काम आधुनिक तंत्रज्ञानाच्या साहाय्याने जानेवारी २०२४ पर्यंत पूर्ण करण्याचे ठरविण्यात आले. त्यानुसार हा पूल बांधणाऱ्या टाटा कंपनीकडून नवीन तांत्रिक उपकरणांचा वापर आणि अतिरिक्त मनुष्यबळाद्वारे पुलाचा सुधारित बांधकाम आराखडा मागविण्यात आला आहे. हा आराखडा प्राप्त झाल्यानंतरच या प्रकल्पाची कालमर्यादा स्पष्ट होणार आहे.

हेही वाचा >>>पुणे : विज्ञान चित्रपट महोत्सवाचे आयोजन

याबाबत बोलताना पीएमआरडीएचे मुख्य अभियंता विवेक खरवडकर म्हणाले, ‘पुम्टासोबत झालेल्या बैठकीनुसार पीएमआरडीएकडून विद्यापीठ चौकालगत असणारी रहदारी, अतिक्रमण, रस्ता दुरुस्ती, पर्यायी रस्ते आणि त्यावरील खड्डे दुरुस्ती याबाबत महानगरपालिका आणि सार्वजनिक बांधकाम विभागाला (पीडब्ल्यूडी) सूचना देण्यात आल्या आहेत. याच ठिकाणावरून हिंजवडी ते शिवाजीनगर मेट्रो मार्गिका प्रस्तावित असून त्यांनाही आवश्यक सूचना देण्यात आल्या आहेत. तत्पूर्वी सोमवारपासून वाहतुकीच्या दृष्टिकोनातून ई-स्क्वेअरपासून फिरोदिया बंगल्यापर्यंत वाहतुकीसाठीचे अडथळे (बॅरिकेड्स) लावण्यास सुरुवात झाली आहे. जवळपास २४० मीटर अंतरापर्यंतचे काम आठवडाभरापर्यंत सुरू राहणार आहे. हे काम संपल्यानंतर टप्प्यानुसार प्रत्यक्षात उड्डाणपुलाच्या खांबांच्या अंतर निश्चितीचे काम सुरू करण्यात येणार आहे.’

हेही वाचा >>>पुणे : अतुल देऊळगावकर यांना न. चिं. केळकर पुरस्कार जाहीर

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

प्रत्यक्ष काम आठ दिवसांनी सुरू
चांदणी चौकातील जुना पूल पाडल्यानंतर रस्ता रुंदीकरणासाठी टेकड्या फोडण्याचे काम सुरू आहे. ठरावीक वेळेत या ठिकाणची वाहतूक बंद करण्यात आली आहे. परिणामी बाह्य वळण रस्त्यामुळे वाहतुकीचा ताण विद्यापीठ चौकातील रस्त्यावर पडतो. त्यामुळे या चौकातील उड्डाणपुलाचे काम चार दिवसानंतर सुरू करण्याचा निर्णय घेण्यात आला. सद्य:स्थितीत प्रत्यक्षात काम सुरू करण्यासाठी रस्ता रुंदीकरण करून वाहतुकीसाठी पर्यायी मार्ग सुधारित करणे महत्त्वाचे आहे. त्यादृष्टीने कामकाज सुरू असून ते आठ दिवस चालणार आहे. त्यामुळे उड्डाणपुलाच्या प्रत्यक्ष कामाला आठ दिवसांनंतर सुरुवात होणार आहे.