पिंपरी : उत्खनन यंत्र जप्त करून शशांक हगवणेच्या ताब्यात देण्यासाठी मध्यस्थी करणाऱ्याला म्हाळुंगे एमआयडीसी पोलिसांनी शुक्रवारी अटक केली. प्रणय तुकाराम साठे (वय २७, रा. कोथरूड) असे अटक केलेल्या मध्यस्थाचे नाव आहे.

या गुन्ह्यात यापूर्वी योगेश राजेंद्र रासकर, गणेश रमेश पोतले आणि वैभव मोहन पिंगळे या तिघांसह वैष्णवी हगवणे मृत्यू प्रकरणातील आरोपी शशांक आणि लता हगवणे यांनाही अटक झाली आहे. याबाबत प्रशांत अविनाश येळवंडे (वय ३३, रा. निघोजे, ता. खेड) यांनी २९ मे रोजी म्हाळुंगे एमआयडीसी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली होती.

चौकशीत तिघा आरोपींनी शशांकचा मित्र साठे याने मध्यस्थी केल्याचे सांगितले. शशांकने चालक देवानंद कोळी याच्यामार्फत ‘गुगल पे’द्वारे ३० हजार रुपये साठे याला दिले. साठेने ती रक्कम पोतले याला ‘गुगल पे’द्वारे दिल्याचे निष्पन्न झाले. त्यानुसार साठे याला शुक्रवारी अटक करण्यात आली.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

दरम्यान, ‘शशांक आणि लता यांची पोलीस कोठडीची मुदत संपल्याने त्यांना आणि साठेला न्यायालयात हजर करण्यात आले. न्यायालयाने तिघांनाही एक दिवस पोलीस कोठडीत ठेवण्याचा आदेश दिला. रासकर, पोतले आणि पिंंगळे या तिघांच्या पोलीस कोठडीची मुदत आज (७ जून) संपणार आहे. या सहा आरोपींना पुन्हा न्यायालयात हजर केले जाईल,’ अशी माहिती वरिष्ठ पोलीस निरीक्षक नितीन गिते यांनी दिली.