पुणे : भोंगा प्रकरणामुळे आधी राज ठाकरेंनी शहराध्यक्ष पद काढून घेतलं अन् आता पोलिसांची नोटीस; वसंत मोरेंच्या अडचणी वाढल्या | Vasant More Get Police Notice Over mosque loudspeakers issue svk 88 scsg 91 | Loksatta

पुणे : भोंगा प्रकरणामुळे आधी राज ठाकरेंनी शहराध्यक्ष पद काढून घेतलं अन् आता पोलिसांची नोटीस; वसंत मोरेंच्या अडचणी वाढल्या

भारती विद्यापीठ पोलीस स्थानकामधील वरिष्ठ पोलीस निरिक्षकांच्या सही शिक्क्यासहीत मोरे यांना नोटीस पाठवण्यात आलीय

पुणे : भोंगा प्रकरणामुळे आधी राज ठाकरेंनी शहराध्यक्ष पद काढून घेतलं अन् आता पोलिसांची नोटीस; वसंत मोरेंच्या अडचणी वाढल्या
पुणे पोलिसांनी पाठवली नोटीस (फाइल फोटो)

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे पुण्यातील मावळते शहराध्यक्ष वसंत मोरे यांच्या अडचणी वाढण्याचं चित्र दिसत आहे. वसंत मोरे यांच्या जागी साईनाथ बाबर यांची नियुक्ती झाल्यानंतर आता मोरेंना पोलिसांची नोटीसही आलीय. भोंगा प्रकरणावरुन मोरेंचं पद गेल्याची चर्चा असतानाच याच प्रकरणावरुन केलेल्या एका वक्तव्यामुळे मोरेंना पोलिसांनी नोटीस पाठवलीय.

नक्की वाचा >> “हॅलो, वसंत मोरे? मुख्यमंत्र्यांना तुमच्याशी बोलायचं आहे”; राज यांनी उचलबांगडी केलेल्या पुण्याच्या माजी मनसे शहराध्यक्षांना फोन

भारती विद्यापीठ पोलीस स्थानकाने मोरे यांना नोटीस पाठवली आहे. या नोटीसमध्ये मोरे यांनी दोन समाजांमध्ये तेढ निर्माण करणारं वक्तव्य केल्याचं सांगत सीआरपीसी १४९ अंतर्गत हीन नोटीस पाठवण्यात येत असल्याचं म्हटलं आहे. भारती विद्यापीठ पोलीस स्थानकातील वरिष्ठ पोलीस निरिक्षकांच्या स्वाक्षरीसहीत ही नोटीस पाठवण्यात आलीय.

नोटीसमधील नेमका मजकूर काय
वसंत कृष्णाजी मोरे, अध्यक्ष महाराष्ट्र नवनिर्माण सेना पक्ष, पुणे शहर
आपणांस या नोटीसद्वारे कळवण्यात येते की दिनांक दोन एप्रिल २०२२ रोजी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली मुंबईत गुढीपाडव्याच्या निमित्ताने शिवाजी पार्क येथे कार्यकर्ता मेळावा आयोजित करण्यात आलेला. सरद मेळाव्यामध्ये पक्षाध्यक्ष राज ठाकरेंनी महाराष्ट्रातील मशिदींवरील भोंगे जर काढले नाहीत तर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने मशिदीसमोर हनुमान चालीसाचे पठण करण्यात येईल असे वक्तव्य केले आहे.

नक्की वाचा >> पुणे शहराध्यक्ष पदावरुन उचलबांगडी झाल्यानंतर वसंत मोरेंची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “मी राज ठाकरेंकडून…”

आपण व आपल्या पक्षांचे पदाधिकारी, कार्यकर्ते यांनी वरील वक्तव्याने अनुषंगाने दोन समाजात धार्मिक किंवा जातीय तेढ निर्माण होऊन कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होईल असं कोणतेही कृत्य करु नये अन्यथा आपणावर प्रचलित कायद्यान्वये कारवाई करम्यात येईल याची नोंद घ्यावी.


नक्की वाचा >> पुण्यातील मनसे शहराध्यक्षांचा राज यांना घरचा आहेर; भोंगे लावण्यास नकार देत म्हणाले, “राजसाहेबांचं भाषण कळलंच नाही, आम्ही…”

दरम्यान, आज पुण्यातील कोंढवा परिसरात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून राज ठाकरे यांच्या विरोधात आंदोलन करण्यात आलं. यावेळी राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी राज ठाकरे मुर्दाबात वसंत मोरे जिंदाबादच्या घोषणा देण्यात आल्या.

मराठीतील सर्व पुणे ( Pune ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 08-04-2022 at 15:18 IST
Next Story
मनसेच्या कारवाईनंतर वसंत मोरेंच्या डोळ्यात अश्रू; म्हणाले, “हकालपट्टी हा विषय मला खूप लागला, रात्रभर…!”