पुणे : सणासुदीच्या काळात वाहने खरेदीला प्राधान्य दिले जाते. यंदा दसरा ते दिवाळी या कालावधीत पुण्यात २५ हजारांहून अधिक वाहनांची विक्री झाली आहे. मागील वर्षीच्या तुलनेत विक्रीत सुमारे ३ हजाराने वाढ झाली असून, ग्राहकांची सर्वाधिक पसंती दुचाकींना आहे.

यंदा दसरा ते दिवाळी म्हणजेच २४ ऑक्टोबर ते १५ नोव्हेंबर या कालावधीत एकूण २५ हजार ४५० वाहनांची विक्री झाली. मागील वर्षी दसरा ते दिवाळी म्हणजेच ५ ऑक्टोबर ते २६ ऑक्टोबर २०२२ या कालावधीत एकूण २२ हजार १८१ वाहनांची विक्री झाली होती. यंदा दुचाकींची विक्री सर्वाधिक असून, ती १४ हजार ९३८ आहे. त्याखालोखाल ५ हजार ९९७ मोटारींची विक्री झाली आहे. याचबरोबर ९२० मालमोटारी, १ हजार ७६ रिक्षा, ८२ बस आणि ६०७ टॅक्सींची विक्री झाली आहे.

हेही वाचा – पिंपरी-चिंचवडमधील ३० हजार इलेक्ट्रिक वाहनचालक हैराण! ‘हे’ आहे कारण

ई-वाहनांची विक्री स्थिरच

यंदा दसरा ते दिवाळी या कालावधीत ५८३ इलेक्ट्रिक वाहनांची विक्री झाली आहे. यंदा ५४१ ई-दुचाकी आणि ४१ मोटारींची विक्री झाली. विशेष म्हणजे एकही ई-रिक्षा, ई-बस आणि ई-टॅक्सीची विक्री झाली नाही.

हेही वाचा – पुणे : धक्कादायक..! पेट क्लिनिकमध्येच गळफास लागून श्वानाचा मृत्यू

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

सणासुदीच्या काळात वाहन खरेदीला पसंती दिली जाते. त्यामुळे दरवर्षी दसरा ते दिवाळी या काळात वाहन विक्रीत वाढ होते. यंदाही वाहन विक्रीत चांगली वाढ दिसून आली. – संजीव भोर, प्रभारी प्रादेशिक परिवहन अधिकारी