जेष्ठ अभिनेते विक्रम गोखले यांचे आज पुण्यातील खासगी रुग्णालयात निधन झाले. त्यांच्यावर गेल्या दोन दिवसांपासून उपचार सुरू होते. विक्रम गोखले यांनी रंगभूमी, चित्रपट आणि दूरचित्रवाणी या तिन्ही ठिकाणी आपल्या कर्तृत्वाचा ठसा उमटवला होता. विक्रम गोखले यांनी ऑगस्ट महिन्यात त्यांच्या पिस्तुल परवानाच्या नुतनीकरणासाठी हिंजवडी पोलीस ठाण्यात भेट दिली होती.

हेही वाचा…ज्येष्ठ अभिनेते विक्रम गोखलेंच्या निधनाने राजकीय वर्तुळात शोक; मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांसह इतर नेत्यांनी वाहिली श्रद्धांजली

“१९ ऑगस्ट २०२२ ला विक्रम गोखले हे पिस्तुल परवाना नूतनीकरनासाठी हिंजवडी पोलीस ठाण्यात आले होते. तेव्हा त्यांचा हात जायबंदी होता, गळ्यात हात अडकवून ते आले होते, शूटिंग दरम्यान अपघात होऊन त्यांचा हात जायबंदी झाल्याचं त्यावेळी त्यांनी सांगितलं, आमचं आयुष्य असंच आहे असंही ते म्हणाले, त्यांच्याशी एक तास हसत खेळत गप्पाही झाल्या”, अशी गोखले यांची आठवण हिंजवाडी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक डॉ.विवेक मुगळीकर यांनी लोकसत्ता ऑनलाईनशी बोलतांना सांगितली.

हेही वाचा… विक्रम गोखले यांना ‘या’ चित्रपटासाठी मिळाला होता राष्ट्रीय पुरस्कार; Video बघून डोळ्यात येईल पाणी

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

मला पोलिसांविषयी विशेष आदर आहे असं सांगत जेष्ठ अभिनेते अमिताभ बच्चन यांच्या अग्निपथ चित्रपटातील कमिश्नर गायतोंडे ही भूमिका माझी आवडती भूमिका असल्याचं विक्रम गोखले यांनी मुगळीकर यांना त्यावेळी सांगितलं होतं. शेवटी जात असताना विक्रम गोखले यांचा पुष्पगुच्छ देऊन हिंजवडी पोलिसांनी सत्कार केला. विक्रम गोखले यांच्या निधनाच्या निमित्ताने गोखले यांच्याबद्दलच्या या सर्व आठवणी आणि भावना वरिष्ठ पोलिस निरीक्षक मुगळीकर यांनी लोकसत्ता ऑनलाईनशी बोलतांना व्यक्त केल्या.