-नागनाथ लोखंडे

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

व्यवसाय म्हटला की वारसा, पैसा आणि प्रचंड पाठबळ लागते; पण काही तरुण हे जिद्द, मेहनत आणि प्रामाणिक कष्टाच्या जोरावर यशस्वी आणि समाजाने आदर्श घ्यावा, असे उद्याोजक होऊ शकतात, ही किमया अहमदनगर जिल्ह्यातील कोपरगाव येथील एक तरुण राजेंद्र साळवे याने करून दाखवली आहे.

जवाहरलाल नेहरू पोर्ट ट्रस्ट (जेएनपीटी) सारख्या भारतातील सर्वांत मोठ्या बंदरांची देखरेख व्यवस्था तसेच संपूर्ण आयात निर्यातीचे व गाड्या कंटेनर यांचे व्यवस्थापन करण्याचे महत्त्वपूर्ण काम राजेंद्र साळवे व त्यांची ‘दिव्या सीपीपी प्रायव्हेट लिमिटेड’ ही संस्था करीत आहे. त्या माध्यमातून या ग्रामीण भागातील तरुणाने सुमारे अडीच हजार लोकांना रोजगार मिळवून दिला आहे.

अत्यंत प्रतिकूल परिस्थितीवर मात करीत संजीवनी इंजिनिअर महाविद्यालयातून अभियांत्रिकीची पदवी घेऊन आत्मविश्वासावर आणि जिद्दीवर साळवे यांनी नोकरी करून पगार घेऊन सरळमार्गी सामान्य जीवन न जगता उद्याोजक होण्याचे स्वप्न बघून पुणे गाठले. पुण्यातील दलित इंडियन चेंबर ऑफ कॉमर्स अँड इंडस्ट्रीच्या परिवारात सहभागी झाले. पद्माश्री मिलिंद कांबळे यांच्या मार्गदर्शनातून विविध व्यवसायाचे पर्याय पाहून त्यामध्ये स्वत:ला घडविण्याचा संकल्प केला.

आणखी वाचा-वर्धानपनदिन विशेष : पुण्याच्या विकासासाठी नागरी संघटना हवी

जवाहरलाल नेहरू पोर्ट ट्रस्ट (जेएनपीटी ) सारख्या भारतातील मोठ्या बंदरांची देखरेख व्यवस्था तसेच संपूर्ण आयात निर्यातीचे व गाड्या कंटेनर यांचे पूर्ण व्यवस्थापन करण्याचे महत्त्वपूर्ण काम राजेंद्र साळवे व त्यांची दिव्या सीपीपी प्रायव्हेट लिमिटेड ही संस्था करीत आहे. ग्रामीण भागातून येऊन त्यांनी अतिशय मोठी आणि महत्त्वपूर्ण झेप घेतली आहे. सध्या त्यांच्याकडे प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्ष सुमारे २५०० कामगार काम करीत आहेत. व्यवस्थापन, नियोजन आणि मेहनत या प्रमुख बाबी आत्मसात करीत त्यांनी आपल्या कामाचा एक वेगळा ठसा उमटवला आहे.

त्यांच्या कार्यशैलीचे वैशिष्ट्ये म्हणजे पूर्वी निर्यातीला २२ तास लागत होते. आता फक्त पाच तास लागत आहेत. त्यांनी या सुविधेमध्ये आमूलाग्र असे बदल केले आहेत. आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर अतिशय सुयोग्य पद्धतीने केला आहे. अतिशय पारदर्शी अशी निर्यात मालाची तपासणी आणि त्याचे व्यवस्थापन हे अतिशय जोखमीचे कामकाज राजेंद्र साळवे आपल्या कौशल्यपूर्ण पद्धतीने करून उत्तम व्यवस्थापनाचा आदर्श निर्माण केला आहे. त्यांच्या या कार्याबद्दल त्यांना अनेक पुरस्कारही मिळाले आहेत.

‘जेएनपीटी’ येथे येणारे देशभरातील वाहनचालक हे उघड्यावर स्वयंपाक तयार करत असत. साळवे आणि त्यांच्या संस्थेने ना नफा ना तोटा, या तत्वावर सर्वांची भोजनाची व्यवस्था केली आहे. यातून त्यांच्यातील सामाजिक जाणीव दिसून आली.

आणखी वाचा-वर्धानपनदिन विशेष : ऊर्जा, आरोग्यासाठी ‘प्रयास’

कोरोनाच्या काळात पद्माश्री मिलिंद कांबळे आणि उद्याोजक राजेश बाहेती यांच्यासह कॉलेज ऑफ इंजनिअरिंग येथे जीवनावश्यक साहित्य व जेवण गरजू लोकांना मोफत पुरविले जात होते. त्यावेळी राजेंद्र साळवे यांनी एकही दिवस घरी न जाता तब्बल ६५ दिवस सेवा करण्याचे अतिशय मोलाचे कार्य केले. त्यांच्या या कार्याला पत्नी प्राची साळवे यांनी साथ दिली. एक यशस्वी उद्याोजक म्हणून उदयास येत असताना त्यांनी सामाजिक कार्यसुद्धा अतिशय तेवढ्याच प्रामाणिकपणे करून दाखवले आहे.

आजच्या तरुण पिढीला केवळ नोकरीवर लक्ष न ठेवता कितीतरी अशी क्षेत्रे आहेत, ज्या ठिकाणी आपण आपल्या जिद्द, मेहनत आणि चिकाटीच्या जोरावर यशाचे शिखर गाठू शकतो, हे नवउद्याोजक राजेंद्र साळवे यांनी दाखवून दिले आहे. हा आदर्श आजची तरुण पिढी नक्कीच घेईल.

Pune News (पुणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Village to jnpt rajendra salves successful journey pune print news mrj
First published on: 26-02-2024 at 16:23 IST