पिंपरी : पुणे आणि रायगड या दोन जिल्ह्यांत विभागलेल्या मावळ लोकसभा मतदारसंघात २५ लाख नऊ हजार ४६१ मतदार आहेत. त्यापैकी चिंचवड विधानसभा मतदारसंघात सर्वाधिक पाच लाख ९५ हजार ४०८ तर पनवलेमध्ये पाच लाख ६५ हजार ९१५ मतदार आहेत. या दोन्ही मतदारसंघांत ११ लाख ६१ हजार ३२३ मतदार आहेत. निवडणुकीत दोन्ही विधानसभा मतदारसंघांतील मतदार निर्णायक ठरणार असून मावळचा खासदार ठरविणार आहेत.

मावळ मतदारसंघातील पिंपरीत तीन लाख ६४ हजार ८०६, चिंचवडमध्ये सर्वाधिक पाच लाख ९५ हजार ४०८, मावळमध्ये तीन लाख ६९ हजार ५३४ तर पनवेलमध्ये पाच लाख ६५ हजार ९१५, कर्जत तीन लाख चार ५२३ आणि उरणमध्ये तीन लाख नऊ हजार २७५ असे २५ लाख नऊ हजार ४६१ मतदार आहेत. त्यात पिंपरी, चिंचवड, मावळमधील १३ लाख २९ हजार ७४८ तर पनवेल, कर्जत, उरणमधील ११ लाख ७९ हजार ७१३ मतदार असून, पुणे जिल्ह्यातील तिन्ही विधानसभा मतदारसंघात एक लाख ५० हजार जास्त मतदार आहेत. तर, १३ लाख १० हजार ४३४ पुरुष तर ११ लाख ९८ हजार ८६८ महिला आणि इतर १५९ असे २५ लाख नऊ हजार ४६१ मतदार आहेत. २४ हजार २७८ नवमतदार असून ८५ पेक्षा जास्त वय असणारे २२ हजार ३८० तर शंभरपेक्षा जास्त वय असणारे एक हजार ३५८ मतदार आहेत. दोन हजार ५६२ मतदान केंद्र आहेत. त्यात शहरी एक हजार ६९१ तर ग्रामीण भागात ८७१ केंद्र आहेत.

Vishwajit Anil Gaikwad trying to get candidature from BJP Udgir Assembly Constituency
रस्ते विकास मंडळाचे गायकवाड यांचे पुत्र आमदारकीसाठी प्रयत्नशील
aarya jadhao missing in Bigg boss marathi reunion
Bigg Boss Marathi 5: सर्व एलिमिनेटेड सदस्यांची घरात…
jarange patil factor impact in assembly elections in marathwada
विश्लेषण : विधानसभा निवडणुकीमध्ये मराठवाड्यात ‘जरांगे फॅक्टर’चा प्रभाव किती?
Nandurbar Vidhan Sabha Constituency Assembly Election 2024
Nandurbar Vidhan Sabha Constituency : लोकसभा निवडणुकीत घटलेल्या मताधिक्याचा परिणाम विधानसभेच्या रणधुमाळीत दिसणार का ?
Ravi Rana in Badnera Vidhan Sabha Constituency Assembly Election 2024
Badnera Vidhan Sabha Constituency : रवी राणा विजयाचा चौकार मारणार? विरोधातील मतविभागणी पथ्यावर पडणार?
Katol Assembly Constituency, Katol Assembly Election 2024, Katol Assembly Constituency Latest Marathi News,
Katol Assembly Constituency : विधानसभा निवडणुकीत अनिल देशमुख बालेकिल्ला राखणार का?
Pune, Thackeray group, Mahavikas Aghadi,
पुण्यात ठाकरे गटामुळे महाविकास आघाडीत वादाची ठिणगी
Sanjay Pandey
Sanjay Pandey : मुंबईचे माजी पोलीस आयुक्त निवडणुकीच्या मैदानात उतरणार? कोण आहेत संजय पांडे?

हेही वाचा : पुणे : महापौर बंगल्यातील जलमापक शोभेसाठी?

२४ विशेष मतदान केंद्र

प्रत्येक विधानसभा मतदारसंघात महिला, युवक, दिव्यांग यांच्याद्वारे संचलित एक, आदर्श सहा असे एकूण २४ विशेष मतदान केंद्र असणार आहेत. तीन हजार ५९४ मतदान यंत्र तर तीन हजार ८१९ व्हीव्हीपॅट उपलब्ध झाले आहेत. मतदानाच्या दिवशी एक हजार २८१ पेक्षा जास्त मतदान केंद्रांवर ‘वेब कास्टिंग’ करण्यात येणार आहे.

पावणेतीन लाख मतदार वाढले

२०१९ च्या लोकसभा निवडणुकीत २२ लाख २७ हजार ६३३ मतदार होते. २०२४ च्या निवडणुकीसाठी आत्तापर्यंत २५ लाख नऊ हजार ४६१ मतदार आहेत. त्यामुळे गेल्या पाच वर्षांत दोन लाख ८१ हजार ८२८ मतदारांची वाढ झाली आहे.

हेही वाचा : भारतातील संशोधन ‘नावापुरते’ असे ज्येष्ठ शास्त्रज्ञ डॉ. अनिल काकोडकर का म्हणाले?

निवडणूक प्रक्रिया पार पाडण्यासाठी १८ हजार कर्मचारी कार्यरत आहेत. आचारसंहिता भंगाच्या ५० तक्रारी निकाली काढल्या आहेत. मतदारांना उन्हात उभे राहू लागू नये यासाठी मंडप टाकण्यात येणार आहे. पाण्याची सोय केली जाणार आहे. ज्येष्ठ नागरिक, गरोदर माता, दिव्यांग नागरिकांना प्राधान्याने मतदान केंद्रात घेतले जाईल. पारदर्शकपणे निवडणूक प्रक्रिया पार पाडली जाईल, असे निवडणूक निर्णय अधिकारी दीपक सिंगला यांनी सांगितले.