लोणावळा : मराठा समाजाला आरक्षण मिळावे ही मागणी मान्य करून राज्य सरकारने तसा अध्यादेश मनोज जरांगे यांच्याकडे सुपूर्द केला. या यशाबद्दल लोणावळा शहरामध्ये गुलालाची उधळण आणि फटाक्यांची आतषबाजी करून जल्लोष साजरा करण्यात आला. तसेच परतीच्या मार्गावर असणारे मनोज जरांगे यांचे वाहन द्रुतगती महामार्गावर गाडी थांबवून लोणावळ्याची चिक्की भरवून तोंड गोड करण्यात आले. त्यांच्यासमवेत असलेल्या सकल मराठा समाजाला लोणावळा परिसरामध्ये मोठ्या प्रमाणात चिक्की वाटप करण्यात आले.

मनोज जरांगे यांच्या सर्व मागण्या शासनाने मान्य केल्या असल्याचे वृत्त समजताच सर्वत्र जल्लोष करण्यात आला. दहा वाजण्याच्या सुमारास मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मनोज जरांगे यांच्या हातामध्ये शासन अध्यादेश सुपूर्त केला. सरबत पाजून त्यांचे उपोषण सोडवले. त्यानंतर लोणावळा शहरात मोठ्या प्रमाणात गुलालाची उधळण करत या विजयाचा जल्लोष साजरा करण्यात आला.

हेही वाचा : “मराठा समाजाला आरक्षण मिळाले, पण…”; मराठा नेत्यांनी व्यक्त केली ‘ही’ भीती

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

शहरातील छत्रपती शिवाजी महाराज चौक या ठिकाणी सकल मराठा समाजाने मोठ्या प्रमाणात एकत्र जमत विजयाचा जल्लोष साजरा केला. तसेच गावोगावी विजयोत्सव साजरा करण्यात आला.