लोकसत्ता प्रतिनिधी

पुणे : दिवाळीच्या पार्श्वभूमीवर किरकोळ बाजारात गहू, गव्हाचे पीठ आणि तांदळाचे दर नियंत्रित ठेवण्यासाठी केंद्र सरकारने २.८५ लाख टन गहू आणि ५१८० टन तांदूळ बाजारात आणला आहे.

केंद्रीय ग्राहक कल्याण मंत्रालय आणि सार्वजानिक वितरण विभागाने दिलेल्या माहितीनुसार, किरकोळ बाजारातील तांदूळ, गहू आणि गव्हाच्या पीठाचे दर नियंत्रणात ठेवण्यासाठी बाजारात हस्तक्षेप थेट हस्तक्षेप करीत ५१८० टन तांदूळ आणि २.८५ लाख टन गहू खासगी बाजारात आणला आहे. सरकारने सरासरी दर्जाच्या गव्हासाठी २१५० रुपये प्रति क्विंटल आणि चांगल्या दर्जाच्या गव्हासाठी २३२७.०४ रुपये प्रति क्विंटल दर निश्चित केला होता.

आणखी वाचा-पुणे : खासगी कर्ज कंपन्यांच्या त्रासातून रिक्षाचालकांची होणार सुटका

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

मिल्स चालकांसाठी गव्हाचे पीठ तयार करण्यासाठी सरकारने २७.५० रुपये किलो दराने गव्हाची विक्री केली आहे. मिल्स चालकांना सरकारने २५ लाख टन गव्हाची विक्री केली आहे. व्यापाऱ्यांनी सरकारी गहू खरेदी करून साठेबाजी करू नये, यासाठी सरकारकडून साठेबाजीवर कठोर नियंत्रण ठेवले जात आहे.