राज्यातील अनेक भागांचे रेडिरेकनर दर आज (गुरुवार) मुद्रांक नोंदणी महानिरीक्षक श्रावण हर्डीकर यांनी पुण्यात पत्रकारपरिषदेत जाहीर केले असून, राज्याची मुंबई वगळता 5 टक्के इतकी रेडरेकनर दरात वाढ झाली आहे. तर ग्रामीण भागात 6.96टक्के वाढ, प्रभावी क्षेत्रात 3.62टक्के वाढ झाली. महापालिका क्षेत्रात 8.80 टक्के इतकी वाढ झाली आहे. तसेच, बृहन्मुंबई महानगरपालिका क्षेत्रात 2.34टक्के वाढ झाली आहे. या रेडिरेकनर दरामुळे नागरिकांना काही प्रमाणात तरी घर घेतांना महागाईला सामोरे जावे लागणार, हे यातून स्पष्ट होत आहे.

यावेळी श्रावण हर्डीकर म्हणाले की, ग्रामीण भागात उपलब्ध खरेदी, विक्री व्यवहाराचा कल, परिसरात झालेला विकास, भूखंड विक्रीच्या जाहिराती, रिअल इस्टेट, वेबसाईट वरील माहिती इत्यादीच्या आधारे माहिती घेऊन सर्वसाधारण वाढ प्रस्तावित केलेली आहे.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

प्रभाव क्षेत्रात 3.90 टक्के वाढ, पुण्यात सरासरी वाढ 6.12 टक्के, तर पुणे शहरात समाविष्ट 23 गावे 10.15 टक्के वाढ, पिंपरी चिंचवड शहरात 12.36 टक्के वाढ करण्यात आली आहे. तसेच राज्यातील सर्वाधिक दरवाढ मालेगाव येथे 13.12 टक्के, तर त्या नंतर औरंगाबाद येथे 12.38 टक्के, तर सर्वांत कमी चंद्रपूर येथे 2.45 टक्के इतकी वाढ करण्यात आल्याचे त्यांनी सांगितले.