लोकसत्ता प्रतिनिधी

पुणे : पगारावरुन वाद झाल्याने कामगाराला बेदम मारहाण करुन त्याचा खून करण्यात आल्याची घटना मॉडेल कॉलनी भागात घडली. याप्रकरणी मालकासह, एका राजकीय पक्षाच्या पदाधिकाऱ्यासह १३ जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

अविनाश भिडे (वय ३६, रा. बेनकर वस्ती, धायरी, सिंहगड रस्ता) असे खून झालेल्याचे नाव आहे. याबाबत भिडे यांची पत्नी रेखा (वय ३०) यांनी चतु:शृंगी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार शेखर महादेव जोगळेकर (वय ५८), प्रणव शेखर जोगळेकर (वय २२, दोघे रा. सुदर्शन सोसायटी, मॉडेल कॉलनी), दयानंद सिद्राम इरकल (रा. पांडवनगर), बाळू पांडुरंग मिसाळ (रा. काकडे पॅलेसजवळ, कर्वेनगर), प्रमोद श्रीरंग शिंदे (रा. शिवणे), रुपेश रवींद्र कदम, संतोष उर्फ बंटी दत्तात्रय हरपुडे, प्रकाश नाडकर्णी, नकुल शेंडकर यांच्यासह चौघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आरोपी दयानंद इरकल राष्ट्रवादी काँग्रेसचा पदाधिकारी आहे.

आणखी वाचा-दक्षिण कोकण, कोल्हापुरात मेघगर्जनेसह पाऊस?

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, जोगळेकर यांच्याकडे अविनाश भिडे मशिन ऑपरेटर म्हणून काम करत होते. जोगळेकर आणि भिडे यांच्यात पगारावरुन वाद झाले होते. ३१ ऑगस्ट २०२२ रोजी जोगळेकर यांनी भिडे यांना दूरध्वनी करुन कामावर लवकर येण्यास सांगितले होते. भिडे दुसऱ्या दिवशी लवकर कामावर गेले होते.त्यानंतर सकाळी साडेदहाच्या सुमारास भिडे यांना कार्यालयात चक्कर आली आहे. ते कार्यालयात पडले असून, त्यांना खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आल्याचे सांगण्यात आले. त्यानंतर भिडे यांची पत्नी रेखा रुग्णालयात गेल्या. तेव्हा जोगळेकर तेथे होते. उपचार सुरु असताना त्यांचा मृत्यू झाला. जोगळेकर यांच्या सांगण्यावरुन आरोपी इरकल, मिसाळ, शिंदे, कदम, हरपुडे, नाडकर्णी, शेंडकर यांनी भिडे यांना बेदम मारहाण केली. रुग्णालयात भिडे यांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला.

आणखी वाचा-सरकारी कामकाजाचा अजब नमुना! ससूनची चौकशी १५ दिवस अन् अहवाल पोहोचायला १२ दिवस

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

याप्रकरणी सुरुवातीला अकस्मात मृत्यू अशी नोंद करण्यात आली होती. शवविच्छेदन अहवालात भिडे यांच्या डोक्याला गंभीर जखमी झाल्याने त्यांचा मृत्यू झाल्याचे अहवालात नमूद करण्यात आले. त्यानंतर पोलिसांनी तपास करुन गुन्हा दाखल केला. गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक जानकर तपास करत आहेत.