पुणे : स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या तरुणाला धमकावून त्याचे मोटारीतून अपहरण करण्यात आल्याची घटना राजेंद्रनगर परिसरात घडली. या प्रकरणी विश्रामबाग पोलिसांनी चार ते पाच जणांविरुद्ध गुन्हा दाखल केला असून, अपहरण झालेला तरुण तसेच आरोपींचा शोध घेण्यात येत आहे.

हेही वाचा – पुणे: मिरज-कोल्हापूर दरम्यानच्या रेल्वे गाड्या रद्द

हेही वाचा – पुणे : स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या तरुणाचे अपहरण; राजेंद्रनगर परिसरातील घटना

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

शिवलिंग दिगंबर गायकवाड (वय ३०, रा. चिंबळी, ता. खेड, जि. पुणे) याने या संदर्भात विश्रामबाग पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. शिवलिंग याचा मावसभाऊ बसवंत माधव गायकवाड (वय २५) स्पर्धा परीक्षेची तयारी करण्यासाठी पुण्यात आला आहे. दोन दिवसांपूर्वी तो रात्री अकराच्या सुमारास शास्त्री रस्त्यावरील अभ्यासिकेतून घरी निघाला होता. त्या वेळी सेनादत्त पोलीस चौकी परिसरात असलेल्या भिडे हाॅस्पिटलजवळ मोटारीतून आलेल्या चार ते पाच जणांनी बसवंतला अडवले. त्याला धमकावून मोटारीत बसवले. त्याचे अपहरण करून आरोपी पसार झाल्याचे शिवलिंग गायकवाड याने फिर्यादीत म्हटले आहे. सहायक पाेलीस निरीक्षक निकुंभ तपास करत आहेत.