पुणे : नऊ वर्षांच्या मुलीसोबत अश्लील कृत्य करुन जिवे मारण्याची धमकी दिल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. याप्रकरणी सहकारनगर पोलिसांनी एका तरुणाविरुद्ध गुन्हा दाखल केला.

पीडित मुलीच्या आईने याबाबत सहकारनगर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. तिने दिलेल्या फिर्यादीनुसार, राहुल राम कुमार (वय २१, रा. धनकवडी) याच्याविरुद्ध बालकांचे लैंगिक अत्याचारांपासून संरक्षण कायद्यान्वये (पोक्सो), तसेच विनयभंग केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी राहुल कुमार धनकवडी भागात राहायला आहे.

याच भागात राहणाऱ्या एका नऊ वर्षाच्या मुलीचा पाठलाग त्याने केला. मुलगी घरात एकटी असल्याचे पाहून त्याने अश्लील कृत्य करण्याचा प्रयत्न केला.या प्रकाराची कोणाला माहिती दिल्यास त्याने तिला जिवे मारण्याची धमकी दिली. घाबरलेल्या मुलीने या प्रकाराची माहिती कुटुंबीयांनी दिली. त्यानंतर आईने पोलीस ठाण्यात धाव घेऊन तक्रार दिली. पोलीस उपनिरीक्षक काळे तपास करत आहेत.

नऊ वर्षांच्या मुलीवर अत्याचार

कोंढवा भागात नऊ वर्षांच्या मुलीवर अतिप्रसंग करण्याचा प्रयत्न करणाऱ्या तरुणाविरुद्ध पोलिसांनी गु्न्हा दाखल केला. याप्रकरणी साहिल अन्वर शेख (रा. कोंढवा) याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला. शेखने मुलीला प्रसाधनगृहात धमकावू नेले. तिच्याशी अश्लील कृत्य करण्याचा प्रयत्न केला, तसेच तिला जिवे मारण्याची धमकी दिली, असे पीडित मुलीच्या आईने दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे. सहायक पोलीस निरीक्षक थोरात तपास करत आहेत.

विवाहाच्या आमिषाने तरुणीवर बलात्कार विवाहाच्या आमिषाने तरुणीवर बलात्कार केल्याप्रकरणी लोणीकंद पोलिसांनी एका तरुणाविरुद्ध गुन्हा दाखल केला. रवी राजकुमार कस्तुरे (वय २५, रा. खराडी) असे गु्न्हा दाखल केलेल्याचे नाव आहे. याबाबत एका २३ वर्षीय तरुणीने लोणीकंद पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. तरुणी आणि आरोपी कस्तुरे यांची ओळख झाली. कस्तुरेने तिला प्रेमाच्य जाळ्यात ओढले. तिला विवाहाचे आमिष दाखवून बलात्कार केला. तरुणीने विविाहाबाबत विचारणा केल्यानंतर त्याने टाळाटाळ केली. फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यानंतर तिने पोलिसांकडे तक्रार दिली. पोलीस उपनिरीक्षक पालवे तपास करत आहेत.