शिवसेनेच्या युवा सेनेचे राज्य सहसचिव किरण साळी यांनी पदाचा राजीनामा दिला आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या गटात साळी सहभागी झाले असून प्रथमच शिवसेनेच्या पदाधिकाऱ्याने अधिकृत राजीनामा दिला आहे. युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांच्याकडे त्यांनी राजीनामा सोपवला आहे.
हेही वाचा- “उठसूट सर्वच निर्णय रद्द करायचे नसतात”; अजित पवारांची सरकारवर टीका
शहरातील माजी नगरसेवकांचा शिंदे गटाला पाठिंबा
राज्यातील सत्ताबदलानंतर शहरातील शिवसेना फुटीच्या उंबरठ्यावर आहेत. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या गटाला शहरातील काही माजी नगरसेवकांनी पाठिंबा दर्शविला आहे. मात्र अद्याप त्याबाबतची अधिकृत घोषणा त्यांच्याकडून करण्यात आलेली नाही. आषाढी वारीनिमित्त पंढरपूरला जाण्यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे पुण्यात आले असताना शिवसेनेजे माजी शहर प्रमुख अजय भोसले, युवा सेना सहसचिव किरण साळी यांनी भाजपचे पुण्याचे खासदार गिरीश बापट यांच्यासह त्यांची भेट घेतली होती. त्याचवेळी हे पदाधिकारी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या गटाला पाठिंबा देणार असल्याचे स्पष्ट झाले होते. या भेटीनंतर किरण साळी यांनी पदाचा राजीनामा दिला.
हेही वाचा- ओबीसी आरक्षणाखेरीज निवडणुका झाल्यास उद्रेक; काँग्रेस ओबीसी शाखेच्या प्रदेशाध्यक्षांचा इशारा
राजीनामा देण्याचे कारण स्पष्ट
सतरा वर्षात गटप्रमुख ते युवासेना सहसचिव या पदावर काम करताना पक्षासंघटना वाढीसाठी योगदान दिले. वंदनीय बाळासाहेब ठाकरे यांच्या हिंदुत्वाशी माझी निष्ठा आहे. मी शिवसेनेचा आहे आणि शिवसेना माझी आहे. हिंदू हदयसम्राट बाळासाहेब ठाकरे आणि धर्मवीर आनंद दिघे यांच्या शिलेदारांना बळ देणे माझे कर्तव्य आहे. त्यामुळे पदाचा राजीनामा देत असल्याचे साळी यांनी स्पष्ट केले आहे.