झोपडपट्टीत दैनंदिन निर्माण होणाऱ्या ओल्या कचऱ्यावर प्रक्रिया करून त्यापासून खत तयार करण्याचा भोसरी गवळीमाथा येथे यशस्वी ठरलेला प्रायोगिक प्रकल्प पिंपरी पालिकेच्या सर्वच क्षेत्रीय कार्यालयात राबवण्याचा मानस असल्याचे प्रशासक तथा आयुक्त शेखर सिंह यांनी सांगितले.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

हेही वाचा- निवडणूक आचारसंहितेचा शिक्षक पुरस्कारांना फटका; पुरस्कार प्रदान कार्यक्रम अनिश्चित काळासाठी लांबणीवर  

गवळीमाथा झोपडपट्टीतील सर्व घरांमध्ये दैनंदिन निर्माण होणाऱ्या ओला कचऱ्यावर प्रक्रिया करून खत तयार करण्याचा प्रकल्प महिला बचत गटातील महिलांच्या सहकार्याने यशवंतराव चव्हाण गुलाबपुष्प उद्यानात सुरू आहे. या प्रकल्पाला भेट देऊन आयुक्तांनी या प्रक्रियेची पाहणी केली. यावेळी ओल्या कचऱ्यापासून तयार केलेल्या खताची पहिली पिशवी आयुक्तांना देण्यात आली. उपआयुक्त अजय चारठाणकर, क्षेत्रीय अधिकारी अण्णा बोदडे, आरोग्याधिकारी तानाजी दाते, उद्यान अधिक्षक गोरख गोसावी आदी उपस्थित होते.

हेही वाचा- पुणे : बारावी, दहावीच्या परीक्षांचे अंतिम वेळापत्रक जाहीर

आयुक्त शेखर सिंह म्हणाले की, शून्य कचरा संकल्पनेवर आधारित हा प्रकल्प स्तुत्य आहे. या माध्यमातून मिशन शून्य कचरा संकल्पनेला प्रोत्साहन मिळेल. तसेच, स्थानिक महिलांना रोजगारही उपलब्ध होईल. गवळीमाथा झोपडपट्टीत हा प्रकल्प यशस्वीपणे राबवण्यात आला. त्या धर्तीवर इतर क्षेत्रीय कार्यालयांमध्ये हा प्रकल्प राबवण्याचा विचार आहे.

हेही वाचा- पुणे: नववर्षाच्या पार्श्वभूमीवर पुण्यात उद्या २७०० पोलीस तैनात; गर्दीच्या ठिकाणांवर पोलिसांची करडी नजर

यासंदर्भात अण्णा बोडदे यांनी सांगितले की, गवळीमाथा झोपडपट्टीत ३७४ कुटुंब आहेत. दररोज ६३७ किलो कचरा निर्माण होतो. त्यातील ओला कचरा ३५८ किलो आणि सुका कचरा २७९ किलो निर्माण होतो. त्यातील ओल्या कचऱ्यावर प्रक्रिया करून त्यापासून खतनिर्मिती करण्यात येते. पर्यावरणाचे संवर्धन आणि महिलांचे स्वावलंबन घडवून आणण्याचा या उपक्रमाचा हेतू आहे.

Pune News (पुणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Zero waste project in all field offices in pimpri chinchwad pune print news bej 15 dpj
First published on: 30-12-2022 at 19:59 IST