News Flash

सॅलड सदाबहार : करिड पोटॅटो मशरूम सॅलड

कडीपत्त्याची फोडणी द्या आणि पान चुरडून सलाड तयार करा.

शेफ नीलेश लिमये

साहित्य 

१० ते १२ उकडलेल्या बटाटय़ाचे चौकोनी काप, १० ते १२ मशरूम्स (अळंबी) उकडून घ्या. २ मोठे चमचे उकडलेले शेंगदाणे, १ बीट किसलेले, १ कांद्याचे चौकोनी काप (चमचा भर तेलात परतून घेणे), चवीपुरते मीठ व मिरपूड, १ चमचा एगलेस मेयोनिज, सजावटीकरिता कढीपत्ता , २ चमचे तिळाचे तेल

कृती

प्रथम एका बाउलमध्ये सर्व भाज्या एकत्र करून घ्या, त्यात चवीपुरते मीठ आणि मिरपूड भुरभुरवा व मेयोनिजचे मिश्रण करा. कडीपत्त्याची फोडणी द्या आणि पान चुरडून सलाड तयार करा. थंड झाल्यावर ते सव्‍‌र्ह करा.

nilesh@chefneel.com

पाककृतीसाठी लागणारा वेळ :

पूर्वतयारीसाठी लागणारा वेळ : 1

एकूण वेळ : 1

पदार्थाचा प्रकार :

किती व्यक्तींसाठी :

लेखक : Array

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on April 21, 2018 2:03 am

Web Title: curried potato mushroom salad
Next Stories
1 फेकन्युज : प्रकाशराज यांनी ट्विट केलेली ‘ती’ छायाचित्रे जुनीच!
2 बेत ठरवा झटपट..
3 खाद्यवारसा : आंबा मोदक
Just Now!
X