तुम्हाला ऑम्लेट खायला आवडतं का? असेल तर ही रेसिपी तुमच्यासाठीच आहे. साधं ऑम्लेट तुम्ही नेहमी खात असाल पण कधी स्पॅनिश ऑम्लेट खाऊन पाहिलं आहे का? त्यासाठी तुम्हाला कोणत्या महागड्या रेस्टॉरंटमध्ये जाण्याची आश्यकता नाही. तुम्ही घरच्या घरी स्पॅनिश ऑम्लेट तयार करू शकता. स्पॅनिश ऑम्लेट तयार करणे फार अवघड काम नाही कारण ही रेसिपी अगदी सोपी आहे आणि झटपट तयार करता येते. साध्या ऑम्लेटपेक्षा ही रेसिपी थोडी वेगळी आहे पण स्पॅनिश ऑम्लेट नक्की आवडेल. मग वाट कसली पाहाताय रेसिपी सेव्ह करा.
स्पॅनिश ऑम्लेट रेसिपी
साहित्य – अंडी दोन, कांदा अर्धा मध्यम (बारीक चिरलेला), बटाटा अर्धा मध्यम (जाड चकत्या), पार्सले १ चमचा (बारीक चिरलेली) किंवा कोथिंबीर बारीक चिरून, चवीसाठी मीठ (स्वादानुसार), ताज्या कुटलेल्या मिया, ऑलिव्ह ऑइल २ चमचे.
हेही वाचा – सोया मिल्क आणि खजूर स्मुदी प्या आणि हेल्दी राहा! झटपट होईल तयार, जाणून घ्या रेसिपी
कृती – बटाट्याची साले काढून घ्या आणि जाड चकत्यात कापून घ्या. एका पॅनमध्ये ऑलिव्ह ऑइल घाला. त्यात कांदा आणि बटाट्याचे काप १०-२० मिनिटे परतून घ्या. तव्यातील काप आणि कांद्याचे मिश्रण निथळून एका भांड्यात घ्या. दुसऱ्या भांड्यात अंडी फेटून घ्या त्यात मीठ, कुटलेल्या मिऱ्या घाला. अंड्याचे हे मिश्रण पहिल्या भांड्यात टाका. हे मिश्रण गरम तव्यावर ओता. त्यात वरून चिरलेले पार्सले अथवा कोथिंबीर घाला. ऑम्लेटची एक बाजू चांगली भाजल्यावर, ऑम्लेट उलटा.
हेही वाचा – कुरकरीत, चटपटीत पोह्याचे कटलेट! मुलांच्या डब्यासह नाश्त्यासाठी झटपट करु शकता तयार, ही घ्या रेसिपी
हेही वाचा – Health special: उन्हाळ्यात शरीरातले पाणी का घटते?
टीप- स्पॅनिश ऑम्लेटबरोबर ब्रेड अथवा चपाती खाण्याची आवश्यकता नाही.