Pure Ghee Recipe: शुद्ध तूप म्हणजे पारंपारिक भारतीय घरांची ओळख आहे. साध्या वरण- भातापासून ते अगदी बिर्याणीला दम देताना सुद्धा तूप वापरले जाते. यामुळे जेवणाला एक चविष्ट टच मिळण्यास मदत होते. जेवणाची चव वाढवण्यासह या तुपाचे आरोग्यला सुद्धा खूप फायदे आहेत. तूप हे जीवनसत्त्व A, D, E आणि K ने समृद्ध असते तसेच तुपात अँटिऑक्सिडंट्स सुद्धा मुबलक प्रमाणात असतात. यामुळे शरीराची रोगप्रतिकारक शक्ती वाढवून विविध संक्रमण थांबवली जाऊ शकतात. तूप पचनास मदत करण्यासाठी पोटातील ऍसिडस्चा स्राव उत्तेजित करते. चिकट कोलेस्ट्रॉल नसांमधून काढून टाकण्यासाठी सुद्धा तूप नामी उपाय मानला जातो. पण हे सर्व फायदे मिळण्यासाठी तूप शुद्ध असणे आवश्यक आहे. आता बाहेरून आणलेल्या गोष्टीवर काही अंशी तरी शंका येणारच, हो ना? म्हणूनच आज आपण घरच्या घरी तूप कसे बनवायचे हे पाहूया…

घरी तूप बनवण्याची रेसिपी (How To Make Ghee at Home)

  • नेहमी फुल क्रीम दूध खरेदी करा.
  • दूध उकळवा आणि खोलीच्या तापमानाला थंड करा.
  • रोज दुधावरची मलाई काढा आणि फ्रीजमध्ये हवाबंद डब्ब्यात ठेवा.
  • १/४ कप दही आणि साखर घालून मिक्स करा. दिवसभर खोलीच्या तापमानात ठेवा. ते जाड आणि मऊ होते.
  • आता यात कप पाणी घाला. हे पांढर्‍या लोण्यातून दुधाचा वास घालवण्यास मदत करते. एकदा मिसळून मग पाणी काढून टाका
  • एक पॅन घ्या यात तयार लोण्याचा गोळा तसेच सुपारी आणि तुळशीची पाने घाला.
  • लोणी वितळण्यास सुरवात होईल आणि लहान पांढरे कण तयार होतील.
  • मंद आचेवर सुमारे 10 मिनिटे शिजवल्यानंतर, पांढरे कण हलके सोनेरी तपकिरी रंगात बदलतील.
  • हलका सोनेरी तपकिरी रंग दिसू लागल्यावर गॅस बंद करा तूप तयार आहे.

हे ही वाचा<< जिलेबी- रबडी खाल्ल्याने डोकेदुखी झटक्यात होते गायब? आयुर्वेद तज्ज्ञांचं स्पष्टीकरण वाचून व्हाल हैराण

UP 10th Standard Topper Girl Prachi Nigam Facial Hair Controversy
अगं प्राची, दहावी बोर्डात पहिली आलीस पण चेहऱ्यावरचे केस काढता आले नाही? नक्की लाज कुणी सोडलीये?
Why are naphthalene balls kept with clothes to be put away How do you use naphthalene balls in a wardrobe
कपड्यांमधील ओलसरपणा, कुबट वास होईल गायब; कपाटात ठेवा ‘ही’ गोळी, जाणून घ्या वापराची योग्य पद्धत
cabbage for weight loss
तुमच्या घरी कायम असणारी ‘ही’ भाजी वाढलेले वजन झपाट्याने करेल कमी; लगेच करा रोजच्या जेवणात समावेश
Summer heat
Health Special : उन्हाळ्याची झळ लागू लागली; काय काळजी घ्याल?

विड्याच्या पानाचा फायदा

तूप बनवताना मलाई खूप दिवस काढून ठेवावी लागत असल्याने त्याला एक विशिष्ट दर्प येऊ लागतो. अनेकदा पाण्यात धुवूनही लोण्यातुन हा वास जात नाही. व तूप कडवताना घरभर हा वास पसरतो. अशावेळी विड्याचे पान किंवा सुपारी/तुळशीचे पान घातल्यास वास निघून जातो. तसेच तुप सुद्धा छान रवाळ व शुद्ध होते. तुपातील चिकटपणा काही प्रमाणात कमी होतो.