Halwa Fish Fry Recipe In Marathi रविवार म्हणजे नॉन व्हेज असं समीकरण बहुतांश मराठी घरांमध्ये पाहायला मिळते. काहीजणांकडे तर रविवारी ठरवून नॉन व्हेज खाल्ले जाते. रविवारच्या दिवशी सुट्टी असल्यामुळे घरामध्ये सर्वजण असतात. अशा वेळी आराम करायच्या दिवशी चमचमीत काहीतरी खायला मिळालं तर किती बरं होईल असं प्रत्येकाला वाटत असते. प्रत्येक सन्डेला चिकन,मटण खाऊन कंटाळा येतो, तेव्हा पटकन होणारा पदार्थ करावा असे वाटते, मग हा पदार्थ छान आहे. चला तर मग आज पाहुयात आगरी कोळी पद्धतीने बनवलेला हलवा फ्राय..

कुरकुरीत न चमचमीत हलवा फिश फ्राय साहित्य

१. हलवा फिश
२. हळद
३. लाल तिखट
४. कोकम- कोकमाचे आगळ
५. ३ हिरव्या मिरच्या
६. तुकडा आले
७. ७-८ लसूण पाकळ्या
८. आले लसूण पेस्ट
९. लिंबू
१०. रवा
११. तांदळाचे पीठ
१२. तेल
१३. चवीनुसार मीठ

कुरकुरीत न चमचमीत हलवा फिश फ्राय साहित्य कृती

१. प्रथम हलवा फिशचे तुकडे कापून स्वच्छ धुवून घ्या.

२. नंतर फिशला उग्र वास येऊ नये म्हणून लिंबू किंवा कोकमाचे आगळ लावून १० मिनिटे ठेऊन द्या.

३. आता दुसऱ्या बाजूला मिक्सरला ३-४ हिरव्या मिरच्या, ८-९ लसूण पाकळ्या, जीरे, आले, कोथिंबीर, धणे ह्यांचे वाटप करून घ्या. नंतर फिशमधील पाणी काढून एका पसरट ताटात घेऊन फिशला पुन्हा एकदा लिंबू चोळून घ्या.

४. नंतर त्यावर हळद, लाल तिखट, आले लसूण पेस्ट, हिरव्या मिरच्याचे वाटप, फिश मसाला, चवीनुसार मीठ घालून ते मिश्रण एकजीव करून प्रत्येक फिशला तो मसाला घोळवून घ्या.

५. आता एका पसरट ताटात रवा, तांदळाचे पीठ थोडे लाल तिखट हळद मीठ घालून हे सर्व मिश्रण एकजीव करा.. आणि त्यात एक एक फिशचा तुकडा चारही बाजूंनी घोळवून घ्या.

६. बाजूला गॅस चालू करून एका कढईत तेल चांगले गरम करून त्यात(घोळवून ठेवलेली फिश) एक एक करून तेलात सोडा. आणि दोन्ही बाजूंनी खरपूस होईपर्यंत फ्राय करा.

हेही वाचा >> घरात भाजी नाहीये? टेन्शन घेऊ नका,आजीच्या पद्धतीने बनवा सातारा स्पेशल झणझणीत बोंबील रस्सा

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

७. तयार आहे गरमागरम हलवा फिश फ्राय. वरून लिंबू आणि बारीक चिरलेली कोथिंबीर घालून भाकरी सोबत सव्हऀ करा.