जेवणाचा स्वाद वाढवण्यासाठी अनेक जण आवडीने चटणी खातात. याशिवाय वेगवेगळ्या पदार्थांबरोबर काही लोकांना चटणी खायला आवडते. आज आपण दही शेंगदाणा चटणी कशी बनवावी, हे जाणून घेणार आहोत. दही शेंगदाणा चटणी ही उपवासाला साबुदाणा थालीपीठ, साबुदाणे वड्यांबरोबरसुद्धा खाऊ शकता. पौष्टिक असलेली ही चटणी खायला तितकीच टेस्टी असते.

साहित्य

  • शेंगदाणे
  • आंबट दही
  • जिरेपूड
  • हिरव्या मिरच्यांची पेस्ट
  • कोथिंबीर
  • साखर
  • मीठ

हेही वाचा : बेसन लाडू कडक होतात? टेन्शन घेऊ नका, असे बनवा जिभेवर ठेवताच विरघळणारे लाडू, ही सोपी रेसिपी लगेच नोट करा

कृती

  • शेंगदाणे भाजून घ्या
  • आणि मिक्सरमध्ये शेंगदाण्याचा बारीक कूट करा.
  • आंबट दह्यात हिरव्या मिरच्यांची पेस्ट, जिरेपुड, बारीक चिरलेली कोथिंबीर आणि मीठ घाला.
  • चवीनुसार साखर घाला
  • दही शेंगदाणा चटणी तयार होईल.