सध्या शाळकरी मुलांच्या उन्हाळी सुट्टी सुरु आहे. सुट्ट्यांमध्ये अनेक जण गावी फिरायला जातात. तर काही जण आजूबाजूच्या परिसरातील मित्र-मैत्रिणींबरोबर सुट्टीचा आनंद घेताना दिसतात. दिवभर खेळून, मजा-मस्ती करून ही चिमुकली एकदम थकून जातात. मग संध्याकाळी घरी पाऊल टाकताच आईला खायला काय बनवलं आह? असे आवर्जून विचारतात? मग या चिमुकल्यांसाठी काय बनवायचं असा प्रश्न अनेकदा आईला पडतो. तर आज सोशल मीडियावर एका खास रेसिपी दाखवली आहे. ‘पिझ्झा पराठा’ असे या अनोख्या पदार्थाचे नाव आहे. चला तर पाहुयात पिझ्झा पराठाची सोपी रेसिपी.
साहित्य –
१. भोपळी मिरची – १/४ कप
२. मका – दोन चमचे
३. पनीर – १/३ कप
४. ऑलिव्ह – एक चमचा
५. चिली फ्लेक्स – एक चमचा
६. ओरेगॅनो – एक चमचा
७. काळी मिरी पावडर – एक चमचा
८. मीठ – एक चमचा
९. धणे – एक चमचा
१०. मॉझरेला चीज – १/३ कप
व्हिडीओ नक्की बघा…
कृती –
१. एका भांड्यात हिरवी, पिवळी, लाल सिमला मिरचीचे बारीक तुकडे करून घ्या.
२. त्यात पनीर किसून घाला.
३. नंतर त्यात ऑलिव्ह, चिली फ्लेक्स, ओरेगॅनो व मीठ घाला.
४. त्यातवरून काळी मिरी पावडर घाला.
५. मक्याचे दाणे, मॉझरेला चीज, कोथिंबीर घाला.
६. अशाप्रकारे पिझ्झा पराठासाठी मिश्रण बनवून घ्या.
७. एक पोळी लाटून घ्या.
८. नंतर एक स्टिलची वाटी घ्या.
९. लाटलेली पोळी वाटीवर झाकून ठेवा.
१०. तयार केलेलं मिश्रण त्यात घाला.
११. त्यानंतर त्यावर दुसरी लाटलेली पोळी झाकून ठेवा.
१२. त्यानंतर पोळीचा उरलेला भाग काढून घेऊ एक वर्तुळाकार पॅटिस तयार झालेलं दिसेल.
१३. हे वर्तुळाकार पेटीस हाताने व्यवस्थित प्रेस करून घ्या.
१४. त्यानंतर मिश्रण आतमध्ये व्यवस्थित राहावे म्हणून काटा चमच्याच्या सहाय्याने करंजीप्रमाणे नक्षी करून घ्या.
१५. पॅनमध्ये तेल घ्या व तयार पॅटिस खरपूस तळून घ्या.
१६. अशाप्रकारे तुमचा ‘पिझ्झा पराठा’ तयार.
सोशल मीडियावर हा व्हिडीओ @foodie_gujarati11 या इन्स्टाग्राम अकाउंटवरून शेअर करण्यात आहे. युजर एक व्हिडीओ क्रिएटर आहे. युजर दररोज नवनवीन पदार्थ व्हिडीओत दाखवत असते. तर आज तिने पिझ्झा पराठा ही रेसिपी दाखवली आहे ; जी घरच्या घरी तुम्ही सहज बनवू शकता. युजरने व्हिडीओच्या कॅप्शनमध्ये रेसिपीसाठी लागणार साहित्य सुद्धा नमूद केलं आहे आणि व्हिडीओत घरगुती पद्धत दाखवली आहे.