सध्या शाळकरी मुलांची उन्हाळी सुट्टी सुरु आहे. सकाळी टीव्हीवर आवडते कार्टून पाहणे, दुपारपासून ते संध्याकाळपर्यंत नवनवीन खेळ खेळणे आदी गोष्टी करण्यात लहान मुले पसंती दर्शवतात. ९०च्या दशकात छोटा भीम, मिकी माऊस, शिनचान, नॉडी, मोगली, डोरेमॉन आदी अनेक कार्टून्स टीव्हीवर पाहताना मुलांची नजर हटायची नाही. यातील काही कार्टून्स आजसुद्धा टीव्हीवर लागतात. पण, सगळ्यात लक्ष वेधून घेणारं कार्टून म्हणजे ‘डोरेमॉन’. डोरेमॉनचे गॅजेट्स, त्याचा Anywhere Door व सगळ्यात खास म्हणजे त्याचा आवडता ‘चॉकलेट डोरा केक’. हे कार्टून बघताना डोरा केक खाण्याची इच्छा आपल्या प्रत्येकाला एकदा तरी नक्कीच झाली असेल. तर आज आपण डोरा केक हा पदार्थ कसा बनवायचा याची सोपी रेसिपी पाहणार आहोत. सोशल मीडियावर एका युजरने डोरा केक कसा बनवायचा हे व्हिडीओत दाखवलं आहे. चला तर पाहुयात या पदार्थाची सोपी रेसिपी.

साहित्य –

  • एक कप मैदा
  • पिठीसाखर, दूध पावडर
  • बेकिंग पावडर
  • व्हॅनिला एसेन्स
  • दूध
  • न्यूट्रेला
  • कोको पावडर, कॉफी पावडर
  • मध
  • मीठ

हेही वाचा…घरच्या घरी, मोजक्या साहित्यात बनवा स्वादिष्ट, मऊ ‘कपकेक’; रेसिपीचा सोपा VIDEO बघा, साहित्य अन् कृती लिहून घ्या

व्हिडीओ नक्की बघा…

कृती –

  • एका भांड्यात मैदा, बेकिंग पावडर, पिठीसाखर, दूध पावडर, कोको पावडर, कॉफी पावडर, मीठ चाळून घ्या.
  • नंतर त्यात दूध, मध घाला. मिश्रण एकजीव करून घ्या.
  • त्यांनतर पॅनमध्ये तेल घाला व टिश्यू पेपरने पुसून घ्या. तयार मिश्रण पॅनकेकप्रमाणे तव्यावर पसरवून घ्या. दोन्ही बाजूने हा चांगला भाजून घ्या. तुमचा डोरा केक तयार झालेला दिसेल.
  • त्यानंतर प्लेटमध्ये डोरा केक घ्या त्यावर न्यूट्रेला पसरवा व त्यावर पुन्हा एक डोरा केक ठेवा व थोडं पसरवून घ्या आणि प्रेस करा.
  • अशाप्रकारे तुमचा चॉकलेट डोरा केक तयार.

सोशल मीडियावर हा व्हिडीओ @anyonecancookwithdr.alisha या इन्स्टाग्राम अकाउंटवरून शेअर करण्यात आला आहे. अलिशा असे या युजरचे नाव असून ती एक कन्टेन्ट क्रिएटर आहे. तर अगदी १० मिनिटात मऊ आणि स्वादिष्ट होणारा हा चॉकलेट डोरा केक तुम्ही घरच्या घरी बनवू शकतात. उन्हाळ्याच्या सुट्टीत मुलं दिवसरात्र खेळतचं असतात. तर त्याच्या चेहऱ्यावर आनंद पाहण्यासाठी व त्यांना त्यांच्या आवडीचा नाश्ता बनवून देण्यासाठी तुम्ही ही रेसिपी नक्की ट्राय करून पाहू शकता.