Mango Seed Mukhwas Recipe In Marathi : कितीही नाही म्हणालो तरी फक्त आंबे खाण्यासाठी आपल्याला उन्हाळा प्रचंड आवडतो. मनसोक्त आंबे खाल्यानंतर आपण सगळेच आंब्याची कोय फेकून देतो. पण, तुम्हाला माहीत आहे का तुम्ही आंब्याच्या कोयीपासून मुखवासदेखील बनवू शकता. जेवणानंतर बडीशेप खायची आपल्याकडे पद्धत आहे. तसेच मुखवास हा प्रकार फारच लोकप्रिय आहे. बाजारामध्ये अनेक प्रकारचे मुखवास मिळतात. पण, तुम्ही घरच्या घरीसुद्धा आंब्याच्या कोयीपासून मुखवास बनवू शकता.

साहित्य (Mango Seed Mukhwas Ingredients)

  • १० आंब्याच्या कोयी
  • पाणी
  • मीठ
  • तूप
  • काळे मीठ
  • लाल मिरची पावडर
  • तूप

व्हिडीओ नक्की बघा…

कृती (Mango Seed Mukhwas Recipe)

  • आंब्याच्या कोयी चांगल्या प्रकारे धुऊन घ्या.
  • त्या कोयी उन्हामध्ये व्यवस्थित वाळवा किंवा १६० सेल्सिअस तापमानावर ओव्हनमध्ये १५-२० मिनिटे वाळवा.
  • त्यानंतर व्हिडीओत दाखविल्याप्रमाणे प्रत्येक कोयीच्या वर असणारे कवच काढून त्यातील एक बी काढून घ्या.
  • बिया स्वच्छ करा. नंतर थोडे मीठ घालून पाण्यात ठेवा. नंतर कुकरमध्ये ठेवून १ शिट्टी द्या.
  • पाणी काढून टाका. नंतर त्या थंड होऊ द्या आणि थोडा वेळ वाळवा.
  • त्यानंतर त्याचे बारीक-बारीक तुकडे करून घ्या.
  • कढईत थोडे तूप गरम करा. त्यात बिया, काळे मीठ, तिखट घाला आणि मंद आचेवर ५-७ मिनिटे कुरकुरीत होईपर्यंत शिजवा.

आंब्याच्या कोयचा मुखवास खाण्याचे आरोग्यदायी फायदे (Mango Seed Mukhwas Health Benefits)

आंब्याची कोय सुद्धा आरोग्यदायी असतात. त्यात अँटीऑक्सिडंट्स आणि निरोगी चरबीचे प्रमाण भरपूर असते, ज्यामुळे कोलेस्टेरॉल नियंत्रित होण्यास आणि एकूणच पचनक्रिया सुधारण्यास मदत होते. त्यांना जेवणानंतर बडीशेप प्रमाणे खाल्ल्याने ते केवळ रुचकरच नाही तर फायदेशीर देखील ठरू शकतात ; जे मार्केटमध्ये मुखवास म्हणून विकल्या जाणाऱ्या बडीशेपपेक्षा चांगले असू शकतात.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

सोशल मीडियावर व्हायरल होणारा हा व्हिडीओ @saltinall या इन्स्टाग्राम अकाउंटवरून शेअर करण्यात आला आहे.