Thalipith Recipe: थालीपीठ हा लोकप्रिय महाराष्ट्रीयन खाद्यपदार्थ आहे. जो सकाळच्या नाश्त्यात हमखास केला जातो. देशातील इतर अनेक भागात देखील थलिपीठ बनवले जाते. थालीपीठ चविष्ट असण्यासोबत पौष्टिक देखील आहे. थालीपीठ बनवण्यासाठी तांदूळ, बाजरी, गहू, ज्वारी आणि बेसन याचे एकत्रित पीठ वापरतात. तसंच थालीपीठ बनवताना अनेक प्रकारच्या भाज्या आणि कांद्याचा वापर देखील केला जातो. मात्र आज आम्ही तुम्हाला मिक्स डाळींचं चविष्ठ आणि आरोग्यसाठी फायदेशीर असं थालीपीठ कसं बनवायचं ते सांगणार आहोत. हे थालीपीठ बनवायला अगदी सोपं आणि खमंग बनत. ही रेसिपी अगदी कमी वेळात बनवून तयार होते. चला तर मग जाणून घेऊया यासाठी लागणारं साहित्य आणि कृती..

साहित्य

  • उडीद डाळ अर्धी वाटी
  • मूग डाळ अर्धी वाटी
  • चना डाळ अर्धी वाटी
  • ज्वारी अर्धी वाटी
  • बाजरी अर्धी वाटी
  • लसूण पेस्ट अर्धा चमचा
  • तीळ पाव चमचा
  • मीठ चवीनुसार
  • तूप एक चमचा
  • पाणी आवश्यकतेनुसार

(हे ही वाचा: क्रिस्पी आणि चटपटीत खायची इच्छा झालीये? तर घरच्याघरी बनवा हेल्दी ‘ज्वारीचे फ्राइज’)

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

कृती

उडीद डाळ, मूग डाळ, चना डाळ, ज्वारी बाजरी एकत्र करून पीठ तयार करून घ्यावं. त्यात लसूण पेस्ट, जिरे, तीळ, मीठ घालावं. यात आवश्यकतेनुसार पाणी घालून मऊ गोळा बनवावा. मध्यम आकाराचे गोळे बनवून लाटून घ्यावेत. तव्यावर दोन्ही बाजूंनी खरपूस भाजून घ्यावेत. हवं असल्यास थोडं तूप लावावं. चवदार थालीपीठ तयार होतात.